शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रोजगार, विकासासाठीच भाजपामध्ये प्रवेश - बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 07:53 IST

'विरोधी पक्षनेता असलो तरी मी माझ्या मतदारसंघातील लोकांना रोजगार, विकासकामे याबाबत मी बांधील होतो.'

पणजी : विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दहा आमदारांसह विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'विरोधात राहून मतदारसंघांतील लोकांची कामे होत नव्हती त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. 

ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचा गेल्या तीन महिन्यातील धडाका पाहिला. सावंत हे नवीन असूनही धडाकेबाज काम करीत आहेत. विरोधी पक्षनेता असलो तरी मी माझ्या मतदारसंघातील लोकांना रोजगार, विकासकामे याबाबत मी बांधील होतो. विरोधात राहून ही कामे झालीच नसती. आम्हाला लोकांना तोंड द्यावे लागते गेली अडीच वर्षे कोणतीच कामे झाली नाहीत आता सत्तेत राहून ती मार्गी लावून भाजपाचे हात बळकट करीन.' याचबरोबर, कवळेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याचेही कौतुक केले. भाजपा श्रेष्ठींना भेटण्यासाठी सर्व दहा आमदार दिल्लीला जात आहोत, असे ते म्हणाले. 

पर्वरी येथे विधानसभा संकुलात सभापतींच्या कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन करण्यासंबंधीचे पत्र देण्यासाठी सायंकाळी काँग्रेसचे आमदार दाखल झाले. सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे त्यांनी पत्र दिले त्यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती मायकल लोबो होते. भाजपच्या कोअर टीम मधील दत्तप्रसाद खोलकर,संजीव देसाई, सरचिटणीस सदानंद तानावडे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली. सभापतींना पत्र सादर करून हे सर्वजण सभापतींच्या दालनातून परतले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा