स्वातंत्र्यसैनिकांच्या १३ मुलांना सरकारी खात्यांमध्ये नोकऱ्या
By Admin | Updated: February 6, 2016 03:05 IST2016-02-06T03:04:23+5:302016-02-06T03:05:03+5:30
पणजी : स्वातंत्र्यसैनिकांच्या १३ मुलांना वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीची पत्रे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या १३ मुलांना सरकारी खात्यांमध्ये नोकऱ्या
पणजी : स्वातंत्र्यसैनिकांच्या १३ मुलांना वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीची पत्रे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ४0६ मुलांपैकी १११ जणांना आतापर्यंत सरकारी नोकऱ्या प्राप्त झाल्या असून पुढील गोवा मुक्तिदिनापर्यंत म्हणजेच १९ डिसेंबरपर्यंत उर्वरित २९५ जणांना नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी
दिले.
पर्वरी येथे सचिवालयात शुक्रवारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना शिक्षक, कारकून, फिल्ड असिस्टंट, चालक, शिपाई, ज्युनियर स्टेनो आदी वेगवेगळ्या पदांवर सामावून घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमास गृह खात्याचे अतिरिक्त सचिव संजीव गडकर, गृह खात्याचे अवर सचिव हरीश अडकोणकर, आयएएस अधिकारी शरत चौहान, गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत केंकरे, श्यामसुंदर नागवेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)