नोकरीची संधी... गोवा शिपयार्डमध्ये ११५ पदांची मेगा भरती
By पूजा प्रभूगावकर | Updated: February 26, 2024 15:47 IST2024-02-26T15:46:21+5:302024-02-26T15:47:54+5:30
माजी सैनिक/माजी-अग्नीवीर आणि दिव्यांग तसेच एसटी एससी उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वयात सूट दिली आहे.

नोकरीची संधी... गोवा शिपयार्डमध्ये ११५ पदांची मेगा भरती
पणजी: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये एकूण ११५ विविध पदांसाठी जाहीरात आली असून यातील ९ पदे ही कायमस्वरुपी तर १०६ पदे ही ३ वर्षाच्या कलावधीसाठी भरली जाणार आहेत. यात कनिष्ट पर्यवेक्षक (कॅन्टीन) १, कनिष्ट पर्यवेक्षक ( इलेक्ट्रिकल सुरक्षा) १, सहाय्यक अधिक्षक (वित्त) २, सहाय्यक अधिक्षक (व्यवसायिक) ३, परिचारिका (पुरुष) २ ही ९ पदे नियमित पदावर भरली जाणार आहेत.
तर सहाय्यक अधिक्षक (एचआर) २, सहाय्यक अधिक्षक (हिंदी अनुवादक) १, सहाय्यक अधिक्षक (सीएस) १, तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) ४, तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रमेंटेशन) १, तांत्रिक सहाय्यक (यांत्रिकी) ४, तांत्रिक सहाय्यक (जहाज बांधणी) २०, तांत्रिक सहाय्यक (सिव्हील)१, तांत्रिक सहाय्यक (आयटी) १, कार्यालय सहाय्यक लिपीक कर्मचारी ३२, ऑफिस असिस्टंट (वित्त/आयए)६, पेंटर २०, वाहन चालक ५, रेकॉर्ड कीपर ३, कुक (दिल्ली कायार्लय) १, कूक २, प्लबंर १, सुरक्षा स्टिवर्ड १ अशी विविधपदे भरली जाणार आहेत.
माजी सैनिक/माजी-अग्नीवीर आणि दिव्यांग तसेच एसटी एससी उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वयात सूट दिली आहे. इच्छूक उमेदवार २८ फेब्रुवारी पासून २७ मार्चपर्यंत सायं. ५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचे स्वरूप www.goashipyard.in या वेबसाइटला उपल्बध आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचे वेबसाइटच्या तपशीलवार दिली आहेत. ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे यशस्वीरित्या अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे, कारण त्यानंतरच्या निवड प्रक्रियेसाठी ते सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण आल्यास ईमेल म्हणजे recruitment@goashipyard.com वर संपर्क साधावा असे गोवा शिपयार्डतर्फे कळविण्यात आले आहे.