शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या चाकाखाली सापडून गोव्यात झारखंडचा युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:30 IST

गोव्यात एका अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून मूळ झारखंड राज्यातील एक युवक जागीच ठार झाला.

मडगाव: गोव्यात एका अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून मूळ झारखंड राज्यातील एक युवक जागीच ठार झाला. राजेश तिरकी (19) असे मृताचे नाव आहे. काल रविवारी रात्री राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील गिरदोली गावात अपघाताची ही घटना घडली. मृत सायकलवरून जात असताना ट्रकची त्याला धडक बसली. यात त्याचे जागीच निधन झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळ काढला. मागाहून रामनगरी भागात अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक सापडला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. ट्रकचालक फरार असून, त्याचा शोध चालू असल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांनी दिली.मृत तिरकी हा गवंडी हेल्पर म्हणून कामाला होता. चांदरहून माकाझन येथे तो सायकलीवरून जात होता. जीए09 यु 4695 क्रमाकांचा मातीवाहू ट्रकही याच मार्गाने जात होता. रात्री पावणोआठच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. मागाहून मायणा - कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह मोतीडोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागारात ठेवला. काल सकाळी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या 279, 304 (अ) व मोटर वाहन कायदा 134 (अ), (ब) कलमांतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ पर्सी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात