गोवा विमानतळावर जेट एअरवेजच्या विमानाला अपघात
By Admin | Updated: December 27, 2016 09:38 IST2016-12-27T08:29:49+5:302016-12-27T09:38:33+5:30
गोव्याच्या दाबोलीम विमानतळाच्या धावपट्टीवरुन मंगळवारी सकाळी जेट एअरवेजचे 9W2374 विमान घसरले.

गोवा विमानतळावर जेट एअरवेजच्या विमानाला अपघात
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - गोव्याच्या दाबोलीम विमानतळाच्या धावपट्टीवरुन मंगळवारी सकाळी जेट एअरवेजचे 9W2374 विमान घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. फक्त काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. क्रू मेंबर्ससह या विमानात एकूण 161 प्रवासी होते.
हे विमान गोव्याहून मुंबईला येणार होते. उड्डाणाच्या तयारीत असतानाच विमान धावपट्टीवरुन घसरले. जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. दुर्घटनेनंतर दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद करण्यात आली होती.आता पुन्हा धावपट्टी खुली झाली आहे. सध्या नाताळ सुरु असून या दिवसात गोव्यामध्ये देश-विदेशातून मोठया संख्येने पर्यटक येतात.