शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

उद्यापासून पुन्हा जोरदार बरसणार पाऊस, येलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 17:00 IST

दीड दोन महिने कोरडे गेल्यानंतर मान्सून गच्छंती जवळ आली असताना पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे. 

पणजी: पावसाळा ऋतू संपण्यासाठी अवघा एक आठवडा राहिला असताना मान्सून आणखी सक्रीय बनला आहे. शनिवारपासून आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने वर्तविला आहे. दीड दोन महिने कोरडे गेल्यानंतर मान्सून गच्छंती जवळ आली असताना पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे. 

शनिवारपासून पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणेश चतुर्थी प्रमाणेच पाच दिवसांची चतुर्थीच्या उत्साहावरही पाऊस विरजण टाकणार असल्याची चिन्हे आहेत. लोकांना मूर्ती विसर्जनेत पाऊस अडथळा आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मान्सूनने इंचाचे शतक पार केल्यानंतर ११८ इंच सरासरी पावसाचे लक्ष्यही पार केले आहे. एकूण सरासरी पाऊस १२० इंच इतका झाला आहे. 

सामान्य प्रमाणापेक्षा हा पाऊस ३.७ टक्क्यांनी अधिक आहे. आठ दिवसात पडलेला पाऊस हा एकूण सरासरी मान्सूनला तूटीकडून अतिरिक्त पावसाकडे घेऊन गेला. एकूण १३ पैकी नि्म्म्या अधिक भागात मान्सून ११८ इंचाहून अधिक पडला आहे. सर्वाधिक पाऊस केपे भागात १३५ इंच इतका तर सांगेत १३१ इंच इतका पडला आहे. फोंड्यात १२६ इंच तर वाळपईत १२४ इंच पाऊस आतापर्यंत नोंद झाला आहे.

...तर यंदा मान्सूनोत्तर पाऊसही१ जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा काळ असा हवामान खात्याकडून नोंदला जातो.३० १ जून पूर्वी पडलेला पाऊस हा पूर्वमान्सून तर ३० सप्टेंबरनंतर पडलेला पाऊस हा मान्सुनोत्त पाऊस अशी नोंद ठेवली जाते. यंदा बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एकंदरच देशात वातावरणात बदल घडून आला आणि मान्सून सक्रीय झाला. याचा प्रभाव आणखी काही दिवस राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडणार, म्हणजेच गोव्याला यंदा मान्सूनोत्तर पाऊस मिळणार असे संकेत आहेत. मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यात पाण्याचा साठा वाढतो. त्यामुळे मे महिन्यात भेडसावणारी पाणी टंचाही होत नाही. २०२१ मध्ये गोव्यात मान्सुनोत्तर पाऊस पडला होता 

टॅग्स :Rainपाऊस