शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:09 IST

पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

पणजी : पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे मत असे आहे की, गोव्यात हा प्रयोग करता येईल. परंतु व्यावसायिकांकडून प्रस्ताव येऊ द्या, या प्रस्तावावर नंतर अभ्यास करून काय तो निर्णय घेता येईल.

गोवा जागतिक नकाशावरील पर्यटन स्थळ म्हणून धडकत आह. येथील किनारी भागात एरवीच नाईट लाईट सुरू असते. देश-विदेशातून जिवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या नाईट लाईफची भुरळ पडलेली आहे. कळंगुट, बागा हणजुण यासारखे ठिकाणी नाईट लाईफ सुरू झाले आहे, कळंगुट भागातील रेस्टॉरंट, शॅक पहाटेपर्यंत उघडे असतात. तेथे मद्य पुरवठाही केला जातो.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचा चांगला निर्णय आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. येथे नाईट लाइफचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळी मॉल्स, मल्टिप्लेक्स उघडे ठेवल्यास पर्यटन व्यवसाय त्याचा फायदा होईल. मात्र त्याचबरोबर पोलिसांच्या गस्ती वाढवायला हव्यात. गोव्याचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी.दुसरीकडे काहीजणांचे मत असे आहे की, सध्या तरी हे शक्य नाही.अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की रात्रीच्या वेळी मॉल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवायची झाली तर आधी लोकांची रहदारी असायला हवी. बागा, कळंगुट आदी किनारी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालतात. राजधानी पणजी शहरात कॅसिनोवर लोक येतात. त्यामुळे काहीशी वर्दळ असते, परंतु जोपर्यंत पुरेशी वर्दळ होत नाही, तोपर्यंत हे शक्य होईल असे वाटत नाही. रात्रीची आस्थापने चालू ठेवण्यासाठी सरकारने धोरण तयार करायला हवे. एखादी गोष्ट आरंभशूरपणे सुरू करणे आणि सहा महिन्यातच बंद करणे, असे होता कामा नये.धोंड यांचे राजधानी शहरात हॉटेल आहे ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे येणारे देशी पर्यटक हे पुन्हा पुन्हा गोव्याला भेट देणारे असतात. गोवा आता महागडे डेस्टिनेशन बनले आहे. भारतीय पर्यटक गुजरात, कर्नाटक, केरळ तसेच शेजारी सिंधुदुर्ग-रत्नागिरीला जातात. कोकणात चांगले किनारे आहेत. तसेच तेथे जलक्रीडाही सुरू झालेल्या आहेत.  त्यामुळे पर्यटक तेथे जातात.पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पणजी शहराचा विचार केला तर रात्रीच्यावेळी केवळ कॅसिनोंमुळे शहरात वर्दळ असते. स्थानिक लोक फिरकत नाहीत. पूर्वी रात्री ८ वाजताच पणजीत सामसूम होत असे. मल्टिप्लेक्स, मॉल्स किंवा  रेस्टॉरंट तास खुले ठेवण्याचा प्रयोग केला तर तो चालेल असे वाटत नाही. पणजी मार्केट कूळ संघटनेचे सचिव धर्मेंद्र भगत म्हणाले की, आधीच स्थानिक दुकानदारांना मॉलनी जेरीस आणले आहे. रात्रीचे उशिरा मॉल चालू राहिल्यास त्याचा मोठा फटका स्थानिक दुकानदारांना बसेल. मॉलना मुभा दिली तर मग बाजारपेठेत दुकानेही रात्रीची खुली का नको? असा सवाल त्यांनी केला.