‘आयटी’ धोरणात सरकारकडून सवलतींचा वर्षाव

By Admin | Updated: January 1, 2016 02:27 IST2016-01-01T02:27:12+5:302016-01-01T02:27:26+5:30

पणजी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी विविध सवलतींची हमी देणारे राज्याचे माहिती तंत्रज्ञान

In the 'IT' policy, government exemptions | ‘आयटी’ धोरणात सरकारकडून सवलतींचा वर्षाव

‘आयटी’ धोरणात सरकारकडून सवलतींचा वर्षाव

पणजी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी विविध सवलतींची हमी देणारे राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण-२०१५ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर व इतरांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषद घेतली. पंधरा हजार रोजगार संधी निर्माण करण्याचे लक्ष्य आयटी धोरणाद्वारे सरकारने समोर ठेवले आहे. चिंबल व तुये येथे आयटी प्रकल्प व इलेक्ट्रॉनिक सिटी सरकार उभी करील. तुये येथे काम मार्गीही लागले आहे. अन्य अनेक ठिकाणी आयटी उद्योग व आयटीविषयी सेवांना सरकार प्रोत्साहन देईल.
‘राज्यात कुठेही आयटी’ ही संकल्पना राबविली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारच्या नव्या आयटी धोरणामुळे राज्याचा आयटी क्षेत्रात वेगाने विकास होऊ शकेल. आयटी उद्योग गोव्याकडे आकर्षित होतील. सरकार इनक्युबेशन सेंटर्स सुरू करील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: In the 'IT' policy, government exemptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.