शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:55 PM

पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.

पणजी : पणजीच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने सुरू असलेला जाहीर प्रचार संपुष्टात येण्यास आता फक्त सहा दिवस बाकी आहेत. पणजीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच प्रमुख लढत आहे आणि या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.

येत्या 19 रोजी पणजीसाठी मतदान होणार आहे. पणजीतील 30 पैकी वीस-बावीस बुथ हे शिक्षित मतदारांचे आहेत. सुभाष वेलिंगकर यांच्या मते पणजीत पैशांची जादू चालत नाही. पंधरा टक्केच मतदारांवर पैशांचा प्रभाव पडतो व तोही पडला तर पडतो, असे वेलिंगकर म्हणतात. भाजपच्या काही महिला नगरसेविकांच्या मते पणजीत पैशांचा वापर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र माजी महापौर वैदही नायक म्हणतात की- पैशांमुळे पणजीतील लोक बदलणार नाहीत, ते भाजपलाच मत देतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की- पैशांचा वापर भाजप करतोय की काँग्रेस पक्ष करतोय ते पणजीतील लोकांना लोकांना ठाऊक आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमधील कथित गैरव्यवहाराचा विषय हा चर्चेत आणला आहे. गोवा सुरक्षा मंचनेही हाच मुद्दा पणजीवासियांसमोर मांडणे सुरू ठेवले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे असे चोडणकर यांनी सांगत अनेक कागदपत्रेही जाहीर करण्याचा इशारा दिला. सुरक्षा मंच तर म्हणतो की भ्रष्टाचार नाही असे भाजपचे म्हणणे असेल तर भाजपने आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा.

भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर व एकूणच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पणजीतील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भाजपला निवडा असे आवाहन मतदारांना केले आहे. स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. ताळगाव मतदारसंघाची सुत्रे अनेक वर्षे मोन्सेरात यांच्याकडे आहे. ताळगावमध्ये अंतर्गत रस्ते खराब आहेत, असे भाजपच्या महिला नेत्यांचे म्हणणे आहे. पणजीतील महिलांची सुरक्षा, पणजीतील दहशतमुक्त वातावरण अशा गोष्टींचा विचार मतदारांनी करावा व मोन्सेरात यांना पराभूत करावे असा प्रचार भाजपच्या यंत्रणोने चालवला आहे. मोन्सेरात म्हणजे दहशत असे समीकरण केले गेले आहे. पणजीत 1995 सालानंतर एकदाही गँगवॉर झाले नाही, असा मुद्दा सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी नुकताच मांडला.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरTerrorismदहशतवाद