शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:29 IST

पर्रिकर आजारी असूनही सकारात्मक आहेत व काँग्रेसने केलेल्या जोरदार टीकेमुळे त्यांनी घरी बैठका घेणे पसंत केले, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये आहे.

गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला

 

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आजारपणातही त्यांच्या निवासस्थानी बैठका घेणे सुरू केल्यामुळे सरकारमधील नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला आहे. नेतृत्व कुणाकडे सोपवावे याविषयी एकमत होत नसल्याने मंत्र्यांनीही तूर्त प्रयत्न थांबवले आहेत. 

पर्रिकर यांची सद्याची स्थिती पाहता सरकारमध्ये एक दिवस नेतृत्व बदल करावा लागेल याची कल्पना भाजपला आणि बहुतेक मंत्र्यांनाही आहे. पर्रिकर आजारी असूनही सकारात्मक आहेत व काँग्रेसने केलेल्या जोरदार टीकेमुळे त्यांनी घरी बैठका घेणे पसंत केले, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये आहे. पर्रिकर यांच्या निवासस्थानी तीन महिन्यांनंतर प्रथमच बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली. पर्रिकर यांना जे मंत्री यापूर्वी भेटू शकत नव्हते, ते मंत्री पर्रिकरांना या बैठकीमुळे भेटू शकले. पर्रिकर बोलतात, सूचना करतात पण त्यांची कार्यक्षमता खूप मर्यादित झालेली आहे. पर्रिकर यांच्याकडे अतिरिक्त खाती यावेळी कुणा मंत्र्याने मागितली नाही. अगोदर अतिरिक्त खात्यांची मागणी मंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर आदी करत होते. यापुढील काळात जो नवा मुख्यमंत्री येईल, तोच सगळे खाते वाटप नव्याने करील.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे गोव्यातील स्थितीवर लक्ष आहे, असे एका मंत्र्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. पर्रिकर हेच आमचे नेते आहेत व त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण आदरही आहे पण प्रशासनाला गती देण्यासाठी पर्यायी नेता यापुढे निवडावा लागेल, असे हे मंत्री म्हणाले.

दरम्यान, सभापती तथा साखळीचे आमदार प्रमोद सावंत हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे. मुख्यमंत्री तूर्त बैठका घेत असल्याने आपण नेता बदलाचा आग्रह जाहीरपणे नको अशी भूमिका काही मंत्र्यांनी व आमदारांनीही घेतली आहे. एका मंत्र्याला आपणच मुख्यमंत्री बनेन असे वाटते. पण पर्रिकर त्या मंत्र्याच्या नावाला अनुकूल नाहीत. शिवाय सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांना नाव मान्य झाल्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व नवा नेता जाहीर करणार नाही. मंत्री विजय सरदेसाई यांनी तर, भविष्यात नेतृत्व बदलाचा विषय आला तर सरकारच्या घटक पक्षांना कुणी गृहित धरू नये, असा इशारा अगोदरच देऊन ठेवला आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरChief Ministerमुख्यमंत्री