आयरिश युवती डॅनियल मॅक्लॉग्लिन खून प्रकरणी आरोप निश्चित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:50 IST2018-03-14T18:50:06+5:302018-03-14T18:50:06+5:30

देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडला होता.

Irish assassin Daniel McLoglin assumes charge in the murder case | आयरिश युवती डॅनियल मॅक्लॉग्लिन खून प्रकरणी आरोप निश्चित 

आयरिश युवती डॅनियल मॅक्लॉग्लिन खून प्रकरणी आरोप निश्चित 

मडगाव : देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकट याला मागाहून अटक केली होती. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिक्षा सायोनोरा लाड यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. 
13 मार्च 2017 रोजी विकट भगत याला डॅनियल खून प्रकरणात काणकोण पोलिसांनी अटक केली होती. भादंविच्या 302( खून), 376 (बलात्कार) व 201 ( पुरावा नष्ट करणे) या कलमाखाली पोलिसांनी त्याच्याविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. संशयिताने डॅनियल हिच्यावर बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याचा आरोप आहे.
या खटल्याच्या मागील सुनावणीच्या वेळी सरकारी वकील कॉस्ता यांनी संशयिताविरुध्द अनेक पुरावे असून, त्याच्यावर आरोपनिश्चित करण्याची मागणी केली होती. सीसीटिव्ही कॅमेराची फुटेजची क्लोन प्रत दयावी व त्यानंतरच युक्तीवाद करण्यास आपल्याला मुभा दयावी  अशी विनंती संशयिताच्या वकिलाने केली केली होती.केंद्र सरकारच्या विदेशी व्यवहार मंत्रालयाने न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने घेण्यास सांगितले होते.
 

Web Title: Irish assassin Daniel McLoglin assumes charge in the murder case