आयपीएल बेटींगचा पर्वरी येथे भांडाफोड! १४ जणांना अटक, २५ लाखांचे साहित्य जप्त
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 28, 2023 17:48 IST2023-04-28T17:48:13+5:302023-04-28T17:48:25+5:30
राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान झालेल्या टी-२० आयपीएल बॅटींग प्रकरणाचा गुन्हा अन्वेषण विभागाने पर्वरी येथे भांडाफोड केला.

आयपीएल बेटींगचा पर्वरी येथे भांडाफोड! १४ जणांना अटक, २५ लाखांचे साहित्य जप्त
पणजी (गोवा) : राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान झालेल्या टी-२० आयपीएल बॅटींग प्रकरणाचा गुन्हा अन्वेषण विभागाने पर्वरी येथे भांडाफोड केला. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून २५.३८ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केले बहुतेक जण हे छत्तीसगढ येथील आहेत. यात रणजीत गेडम (२८,छत्तीसगढ),प्रवीण राजपूत (२४,छत्तीसगढ ),अंकित चौधिहार (२४,छत्तीसगढ),मोहीत कुमार (२८,बिहार),नंदा किशन (५४,छत्तीसगढ),ज्योती प्रकाश (३८,छत्तीसगढ),केशम कुमार (२०,छत्तीसगढ), अय्याज खान (२६,छत्तीसगढ),जगदीश वर्मा (२४,छत्तीसगढ),राजन दुबे (२३,उत्तर प्रदेश),कवल सिंग (४०,छत्तीसगढ),पंकज चौरे (२७,छत्तीसगढ), मंजित सिंग (४१,छत्तीसगढ), नितीश पांडये (१९,छत्तीसगढ) यांचा समावेश आहे.
सर्व संशयितांना पर्वरी येथील डायनेस्टी व्हिला क्रमांक १ मध्ये राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान झालेल्या टी २० आयपीएल मॅचवर सट्टा घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. प्राप्त माहितीच्या आधारे ही कारवाई झाली.