गुंतवणूकदार बनले आक्रमक

By Admin | Updated: January 3, 2016 01:46 IST2016-01-03T01:46:05+5:302016-01-03T01:46:22+5:30

मडगाव : शहरातील एका मनी एक्सचेंजर आस्थापनात शनिवारी लोकांची एकच गर्दी झाली होती. या एक्सचेंजमध्ये दिलेली

Investor became aggressive | गुंतवणूकदार बनले आक्रमक

गुंतवणूकदार बनले आक्रमक

मडगाव : शहरातील एका मनी एक्सचेंजर आस्थापनात शनिवारी लोकांची एकच गर्दी झाली होती. या एक्सचेंजमध्ये दिलेली रक्कम मिळत नसल्याने येथे खळबळ उडाली होती. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. मात्र, सर्व रक्कम देऊ, अशी खात्री आस्थापनप्रमुखाने दिल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली नाही.
उपलब्ध माहितीनुसार, विदेशी चलन घेऊन भारतीय चलन देणाऱ्या या आस्थापनात अनेकजण चलन बदलून घेतात. या आस्थापनाने एक नवी योजना सुरू केली होती. त्यानुसार काही दिवसांनंतर पैसे घेतल्यास रक्कम वाढवून दिली जात होती. ग्राहकांना पोस्टपेड धनादेश दिले जात होते. अनेकांनी रक्कम ज्यादा मिळणार म्हणून या योजनेत गुंतवणूक केली होती. मात्र, गेले काही दिवस यातील काहींना रक्कम मिळाली नाही. सासष्टीत अनेकजण परदेशात असतात. बहुतेकजणांनी या मनी एक्सचेंजमध्ये रक्कम दिली होती. पैसे बुडाले म्हणून दुपारी या आस्थापनात लोकांनी एकच गर्दी केली होती. लोक आक्रमक झालेले बघून आस्थापनातील कर्मचारीही पळून गेले. मागाहून हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. तेथे समेट घडल्यानंतर लोक घरी परतले.
(प्रतिनिधी)

Web Title: Investor became aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.