सेझ घोटाळा, झुग मोबोर जमीन प्रकरणाची चौकशी

By Admin | Updated: July 31, 2015 02:09 IST2015-07-31T02:07:07+5:302015-07-31T02:09:25+5:30

पणजी : सेझ घोटाळा तसेच केळशीजवळील झुग मोबोर जमीन बळकाव प्रकरणाची चौकशी करू, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले

The investigation into the case of the SEZ scam, Zug Moobore land | सेझ घोटाळा, झुग मोबोर जमीन प्रकरणाची चौकशी

सेझ घोटाळा, झुग मोबोर जमीन प्रकरणाची चौकशी

पणजी : सेझ घोटाळा तसेच केळशीजवळील झुग मोबोर जमीन बळकाव प्रकरणाची चौकशी करू, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. ‘सेझ’ प्रकरण चौकशीसाठी पुन्हा खुले केले जाणार आहे.
गृह खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आमदार माविन गुदिन्हो यांनी ही मागणी केली. लुईस बर्जर लाच प्रकरणात पोलिसांना तपासकामाच्या बाबतीत मुक्त हस्त देण्यात आला असून कोणताही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही किंवा राजकीय सूडही उगविलेला नाही, असे पार्सेकर म्हणाले. लुईस बर्जरने चूक स्वीकारली आहे. अमेरिकन कोर्टाने त्यानंतर या कंपनीला दंडही आकारलेला आहे. या प्रकरणात ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना धडा शिकवायलाच हवा. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे पार्सेकर म्हणाले.
सेझ, झुग मोबोरची चौकशी करा : माविन
ड्रग्स व्यवहार आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. पोलीस खंडणीबहाद्दर बनले आहेत, असा आरोप माविन यांनी केला. अन्य घोटाळ्यांचीही चौकशी व्हायला हवी. सेझ घोटाळा प्रकरणात ४० लाख चौरस मीटर जमीन उद्योगांकडे पडून आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे का नोंदवले नाहीत? (पान २ वर)

Web Title: The investigation into the case of the SEZ scam, Zug Moobore land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.