सर्व व्यवहारांची चौकशी करा : सरदेसाई
By Admin | Updated: July 19, 2015 01:44 IST2015-07-19T01:43:56+5:302015-07-19T01:44:06+5:30
मडगाव : लुईस बर्जर कंपनीच्या भ्रष्टाचारी कार्यकारी अधिकाऱ्याने काँग्रेस व भाजपा सरकारला अनेक प्रकल्पांत मार्गदर्शन केल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार

सर्व व्यवहारांची चौकशी करा : सरदेसाई
मडगाव : लुईस बर्जर कंपनीच्या भ्रष्टाचारी कार्यकारी अधिकाऱ्याने काँग्रेस व भाजपा सरकारला अनेक प्रकल्पांत मार्गदर्शन केल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. दोन्ही पक्षांशी या कंपनीचे लागेबांधे असून दोन्ही सरकारांच्या काळातील सर्व व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे़
देशाचे संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कंपनीचे विधानसभेत समर्थन केले होते, असा आरोपही त्यांनी केला. लुईस बर्जरने प्रायोजित मोपा विमानतळाचा तांत्रिक शक्यता पडताळणी अहवाल तयार केलेला आहे. त्यासाठी १४ कोटी रुपये दिले आहेत़ त्यावर कसा विश्वास ठेवावा, (पान २ वर)