‘डायोसेझन’ची घुसमट
By Admin | Updated: June 11, 2015 01:00 IST2015-06-11T01:00:15+5:302015-06-11T01:00:15+5:30
पणजी : राज्यातील शिक्षण क्षेत्रावरील आपला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे व त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याकांच्या शाळांना सरकारकडून

‘डायोसेझन’ची घुसमट
पणजी : राज्यातील शिक्षण क्षेत्रावरील आपला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे व त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याकांच्या शाळांना सरकारकडून सापत्नभावाची वागणूक मिळत आहे, अशी डायोसेझन बोर्ड आॅफ एज्युकेशन संस्थेची भावना बनली आहे. याच विषयावरून भाजप, काँग्रेस व अपक्ष ख्रिस्ती मंत्री, आमदार बुधवारी एकत्र आले व त्यांनी सरकारचे लक्ष या विषयाकडे वेधण्याचा निर्णय घेतला.
राज्यात डायोसेझन बोर्ड आॅफ एज्युकेशनतर्फे इंग्रजी माध्यमाच्या अनेक प्राथमिक शाळा व हायस्कूल चालविली जात आहेत. या संस्थेने यापूर्वी कधीच आपले प्रश्न सोडविण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय मंत्री, आमदारांचे संघटन केले नव्हते. बुधवारी प्रथमच सत्ताधारी भाजप, काँग्रेस व अपक्ष मंत्री, आमदारांची डायोसेझन मंडळाने पणजीतील पिएदाद (पान २ वर)