दीक्षा, अंकिता, नवनाथ, उल्हास दावेदार

By Admin | Updated: April 6, 2015 01:20 IST2015-04-06T01:17:35+5:302015-04-06T01:20:41+5:30

पणजी/मडगाव : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदाकरिता दीक्षा कांदोळकर व अंकिता नावेलकर, तर दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपदासाठी

Initiation, Ankita, Navnath, Ulhas contenders | दीक्षा, अंकिता, नवनाथ, उल्हास दावेदार

दीक्षा, अंकिता, नवनाथ, उल्हास दावेदार

पणजी/मडगाव : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदाकरिता दीक्षा कांदोळकर व अंकिता नावेलकर, तर दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपदासाठी नवनाथ नाईक व उल्हास तुयेकर प्रबळ दावेदार आहेत. सोमवारी (दि.६) सकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अंतिम बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. दक्षिणेत उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव असून, ते मगोकडे जाईल. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी (दि.७) होणार आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यासाठी भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांची अनौपचारिक बैठक रविवारी झाली. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी प्रत्येक सदस्याबरोबर चर्चा करून मते जाणून घेतली. निवडीचे अधिकार सर्वांनी पक्षालाच दिले आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनिमित्त गोव्याबाहेर आहेत. ते परतल्यानंतर सोमवारी पुन्हा बैठक होईल.
उत्तर गोव्यात रोटेशन पद्धतीने या वेळी अध्यक्षपद, तर दक्षिण गोव्यात उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. शिरसईतून निवडून आलेल्या भाजपच्या दीक्षा कांदोळकर, तसेच सर्वण-कारापूर मतदारसंघात निवडून आलेल्या भाजपच्याच अंकिता नावेलकर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.६) दु. १२ वा.पर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. उत्तर गोव्यातील सदस्यांनी तिसवाडी गटविकास कार्यालयात भिकू गावस यांच्याकडे, तर दक्षिणेतील सदस्यांनी दक्षिणेचे पंचायत उपसंचालक चंद्रकांत शेटकर यांच्याकडे अर्ज सादर करावेत. दुपारी १२ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उत्तर गोव्यात एका मंत्र्याने अध्यक्षपद पुरुषाकडे यावे आणि या जागी हणजूणचे सदस्य वासुदेव कोरगावकर यांची वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते; परंतु रोटेशन पद्धतीमुळे तसे करणे शक्य झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Initiation, Ankita, Navnath, Ulhas contenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.