गोव्याला इंडिया टुडेचा पुरस्कार

By Admin | Updated: October 10, 2016 21:28 IST2016-10-10T21:28:28+5:302016-10-10T21:28:28+5:30

देशातील लहान राज्यामध्ये गोव्याने चांगल्या प्रकारे विकास केला, असे प्रमाणपत्र इंडिया टुडे समुहाने देऊन गोवा राज्याला पुरस्कार जाहीर केला आहे.

India Today Award for Goa | गोव्याला इंडिया टुडेचा पुरस्कार

गोव्याला इंडिया टुडेचा पुरस्कार

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.10 - देशातील लहान राज्यामध्ये गोव्याने चांगल्या प्रकारे विकास केला, असे प्रमाणपत्र इंडिया टुडे समुहाने देऊन गोवा राज्याला पुरस्कार जाहीर केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना येत्या 4 रोजी दिल्लीत होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्य़ासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
आरोग्य व साधनसुविधा निर्माण क्षेत्रात गोव्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच एकूण प्रगतीमध्येही छोटय़ा राज्यांच्या तुलनेत गोवा हे अग्रेसर असल्याचे इंडिया टुडेला आढळून आले आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकमतशी बोलताना या पुरस्कारांबाबत आनंद व्यक्त केला. खाण बंदीमुळे महसुल प्राप्ती कमी झाली तरी, देखील आम्ही अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण केली व कल्याणकारी योजनाही सुरू ठेवल्या,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: India Today Award for Goa