गोवा चित्ररथ निर्मितीचे काम वेगाने; २२ जानेवारीपर्यंत समर्पित करण्यासाठी ३० जणांचा चमू रात्रंदिवस राबतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 08:25 IST2025-01-11T08:23:39+5:302025-01-11T08:25:46+5:30

गोव्यातील फोंडा येथील कलाकार सुशांत खेडेकर यांनी चित्ररथाची संकल्पना आणि रचना केली आहे.

india republic day 2025 the goa chitrarath production work in full swing a team of 30 people is working day and night to dedicate it | गोवा चित्ररथ निर्मितीचे काम वेगाने; २२ जानेवारीपर्यंत समर्पित करण्यासाठी ३० जणांचा चमू रात्रंदिवस राबतोय

गोवा चित्ररथ निर्मितीचे काम वेगाने; २२ जानेवारीपर्यंत समर्पित करण्यासाठी ३० जणांचा चमू रात्रंदिवस राबतोय

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथ येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या गोवा राज्याच्या चित्ररथ निर्मितीचे काम राष्ट्रीय रंगशाळा कॅम्प, नवी दिल्ली येथे जोरात सुरू आहे.

गोव्यातील फोंडा येथील कलाकार सुशांत खेडेकर यांनी चित्ररथाची संकल्पना आणि रचना केली आहे. २६ डिसेंबर २०२४ पासून राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात चित्ररथाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. खेडेकर आणि पूर्णानंद पैदरकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील ३० शिल्पकार, कारागीर, फॅब्रिकेटर्स, सुतार आणि इतर लोकांची टीम २२ जानेवारीपर्यंत चित्ररथ तयार करण्यासाठी समर्पित प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यावर्षी गोवा राज्य गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचे चित्रण करणारा 'स्वर्णिम भारत, विरासत आणि विकास' या संकल्पनेवर रंगीत चित्ररथ सादर करणार आहे. हा सर्व गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण असून, गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे आणि प्रगतीचे चित्रण करणारा हा चित्ररथ २६ जानेवारी रोजी दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात प्रदर्शित करण्यात येईल. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्य पथावर २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य आणि संघप्रदेशासह १५ चित्ररथांची तसेच १० मंत्रालये, विभागांच्या चित्ररथांची निवड केली आहे. 'स्वर्णिम भारत-विरासत आणि विकास' म्हणजे 'सुवर्ण भारत, वारसा आणि विकास' अशी या वर्षाची संकल्पना आहे.

माहिती आणि प्रसिद्धी खात्या अंतर्गत प्रदर्शित होणारा गोवा चित्ररथ भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निवडण्यात आला आहे. संकल्पना, डिझाइन आणि व्हिज्युअल घटकांच्या विविध पैलूंचा विचार करून तज्ज्ञ समितीने गोवा चित्ररथास मान्यता दिली आहे

लाइव्ह नृत्याची तयारी 

या वर्षी या चित्ररथासाठी संगीत डॉ. साईश देशपांडे यांनी दिले आहे आणि श्री दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखाली लाइव्ह डान्स सादर करण्यात येईल. नृत्यदिग्दर्शन निषाद यांनी केले आहे, तर वेशभूषा संगीता आणि अवनी खेडेकर यांनी केली आहे. कर्तव्य पथावरील संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत भारत पर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून इतर सहभागी राज्यांसह गोव्याचा चित्ररथ लाल किल्ल्यावर प्रदर्शित केला जाईल. या काळात संबंधित राज्यांतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

 

Web Title: india republic day 2025 the goa chitrarath production work in full swing a team of 30 people is working day and night to dedicate it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.