दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणारा भारत हा एकमेव देश

By किशोर कुबल | Published: February 6, 2024 01:54 PM2024-02-06T13:54:24+5:302024-02-06T13:54:47+5:30

गोव्यात बेतुल येथे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

India is the only country to reduce the prices of petrol and diesel in two years | दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणारा भारत हा एकमेव देश

दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणारा भारत हा एकमेव देश

पणजी : ‘दोन वर्षात पेट्रोलडिझेलचे दर कमी करणारे भारत हे एकमेव राष्ट्र ठरले आहे. केवळ पंतप्रधानांच्या जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे हे होऊ शकले.’,असा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केला.

गोव्यात बेतुल येथे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
हरदीपसिंग म्हणाले कि,‘ राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहासाठी यावेळी ९०० प्रदर्शक आलेले आहेत व गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के जास्त आहे. ३५० आंतरराष्ट्रीय कंपन्या, १५ देशांचे ऊर्जामंत्री व ३५ हजार प्रतिनिधी भाग घेणार आहेत. उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे विशेष मेक इन इंडिया पॅव्हेलियन, जे ऊर्जा क्षेत्रातील भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून नवनवीन उपायांचे प्रदर्शन करते. पुरी म्हणाले की कॅनडा, जर्मनी, रशिया, नेदरलँड्स, इंग्लंड आणि अमेरिका या सहा देशांनी येथे पॅव्हिलियन्स उभारले आहेत.’

९ तारीखपर्यंत पुढील तीन दिवस राष्ट्रीय ऊर्जा सप्ताह चालणार आहे.  हरदीपसिंग म्हणाले कि, ‘ऊर्जा सप्ताह केवळ ऊर्जा क्षेत्रातील प्रगती दाखवण्यासाठी फक्त व्यासपीठच प्रदान करत नाही तर उद्योग वाढीला चालना देण्यासाठी उत्प्रेरक म्हणूनही काम करतो. भारताने जैवइंधन संमिश्रण उद्दिष्टांना गती दिली आहे, असे ते म्हणाले.

Web Title: India is the only country to reduce the prices of petrol and diesel in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.