शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'भारताकडून इंग्लंडला 34 रुपयांनी पेट्रोल निर्यात, मग भारतात महाग का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 12:51 IST

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत.

पणजी : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत. इंधन दरवाढीच्या प्रश्नावर प्रदेश काँग्रेसने आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. यावेळी आमदारही रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे. तसेच भारताकडून इंग्लंडला 34 रुपये लिटर दराने पेट्रोल दिले जाते, असेही सोपटे यांनी सांगितले.

आमदार सोपटले म्हणाले की, ‘गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने 12 वेळा कर वाढवला. मे 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा 211 टक्के कर होता, तो आज 446.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. गोव्यात 2014 साली पेट्रोलचा दर 61 रुपये आणि डिझेलचा दर 58 रुपये प्रति लिटर होता. आज हेच दर अनुक्रमे 73.22 रुपये आणि 72.74 रुपयांवर पोहोचले आहेत. सर्वसामान्य जनतेचे या महागाईत कंबरडेच मोडलेले आहे. देशात वाहनधारकांना एवढे महाग इंधन खरेदी करावे लागत असताना भारतातून इंग्लंड किंवा अन्य राष्ट्रांना निर्यात केले जाणारे पेट्रोल 34 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 37 रुपये प्रति लिटर या दराने निर्यात केले जाते. यातून तब्बल 11 लाख कोटी रुपये महसूल देशाला मिळतो हे खरे असले तरी अन्य राष्ट्रांना कमी दराने निर्यात करण्यापेक्षा देशातील वाहनधारकांना ते स्वस्तात उपलब्ध करणे संयुक्तिक ठरेल, असे सोपटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, चांगल्या गोष्टीचे श्रेय आपल्याकडे घेणे आणि वाईट गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे अशी भाजपची नीती बनली आहे. 2014 साली स्वयंपाकाचा गॅस 414 रुपये होता. आज तो 807 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढलेला नाही.  पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुली काढून एलपीजी गॅस घेण्यास लोकांना भाग पाडले. आता गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून सर्वसामान्यांना जीणे मुश्किल बनले आहे. डिझेल महाग झाल्याने ट्रॉलरमालकांना ट्रॉलर बंद ठेवावे लागत आहेत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीही इंधन आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या प्रश्नावर आंदोलन छेडले होते.  

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसMLAआमदारPetrolपेट्रोल