दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न
By पूजा प्रभूगावकर | Updated: December 27, 2023 17:00 IST2023-12-27T16:58:33+5:302023-12-27T17:00:45+5:30
विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.

दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: मागील दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? यापूर्वीच्या आलेल्या विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.
भाजप सध्या विकसित भारत हा उपक्रम देशभरात राबवत आहे. मागील दहा वर्षातच देशाची प्रगती झाली का ? भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष झाली.तर मग भाजपच्या म्हणण्यानुसार मागील ६६ वर्षात आलेल्या कुठल्याही सरकारांनी विकास केला नाही. केवळ भाजपनेच देशात शुन्यातून विकास घडवला का ? अशी टीकाही त्यांनी केली.
वळवईकर म्हणाले, की सत्ता हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते धर्माचे, जातीचे राजकारण करीत आहेत. विविध गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या राजकीय नेत्यांना ते आपल्या पक्षात घेऊन सत्ता स्थापन करीत आहेत. यावरुन त्यांना केवण सत्तेशी मतलब असल्याचे स्पष्ट होते. देश स्वातंत्र झाला, तेव्हा देशात आरोग्य, वाहतूक, शिक्षण आदी क्षेत्रात पायाभूत सुविधा नव्हत्या. या सर्व सुविधा त्यानंतर विविध पक्षांच्या सरकारने तयार केल्या. मात्र भाजप केवळ स्वत:चीच पाठ थाेपटत असल्याची टीका त्यांनी केली.