सात पालिकांच्या प्रभागांत वाढ
By Admin | Updated: June 12, 2015 00:48 IST2015-06-12T00:48:36+5:302015-06-12T00:48:49+5:30
पणजी : सात नगरपालिकांच्या प्रभाग संख्येत सरकारने वाढ केली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी नगर विकास खात्याचे संचालक एल्वीस गोम्स यांनी जारी केला आहे

सात पालिकांच्या प्रभागांत वाढ
पणजी : सात नगरपालिकांच्या प्रभाग संख्येत सरकारने वाढ केली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी नगर विकास खात्याचे संचालक एल्वीस गोम्स यांनी जारी केला आहे. एकूण अकरा पालिकांच्या निवडणुका येत्या दि. २५ आॅक्टोबरला घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने सरकारला केली आहे. नगरसेवकांची संख्या आता बावीसने वाढणार आहे.
वाळपई, पेडणे, सांगे, काणकोण या चार नगरपालिकांची प्रभाग संख्या सरकारने वाढवलेली नाही. मुरगाव, मडगाव आणि म्हापसा पालिकेची प्रभाग संख्या वाढवली आहे. मुरगाव व मडगावसाठी आता प्रत्येकी पंचवीस, तर म्हापसा पालिकेसाठी वीस प्रभाग निश्चित केले आहेत. डिचोली व कुंकळ्ळी पालिकेची प्रभाग संख्या दहावरून बारा करण्यात आली आहे, तर कुडचडे-काकोडा पालिकेची प्रभाग संख्या बारावरून चौदा करण्यात आली आहे. केपे पालिकेची प्रभाग संख्या अकरा करण्यात आली आहे.
आता कोणत्या पालिकेच्या कोणत्या प्रभागात किती मतदारसंख्या ठेवावी, हे फेररचनेच्या प्रक्रियेअंती निश्चित होईल. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण केले जाणार आहे. ही प्रक्रिया पालिका प्रशासन खातेच पार पाडणार आहे. सध्या फक्त प्रत्येक पालिकेची प्रभाग संख्या निश्चित केली गेली आहे. आता एकूण प्रभाग संख्या १५९ झाली आहे. (खास प्रतिनिधी)