गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू
By किशोर कुबल | Updated: March 15, 2024 14:05 IST2024-03-15T14:05:04+5:302024-03-15T14:05:19+5:30
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा डीएचा फरक एप्रिलच्या वेतनात दिला जाईल.

गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू
पणजी : राज्य सरकारच्या कर्मचाय्रांना महागाई भत्ता (डीए) मूळ पगाराच्या ४६ टक्क्यांवरुन वाढवून ५० टक्के केला असून १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू होणार आहे.
या संबंधीचा आदेश वित्त खात्याचे अवर सचिव नरेश गावडे यांनी काढला आहे. सुमारे ६५ हजार कर्मचारी तसेच ३० हजारांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होईल. सरकारी कर्मचाय्रांबरोबरच अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक, कर्मचाय्रांनाही याचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी आपल्या कर्मचाय्रांना महागाई भत्ता वाढवला होते. केंद्राने तो वाढवल्यानंतर राज्य सरकारही आपल्या कर्मचाय्रांना अशीच वाढ लागू करते. कर्मचाय्रांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा डीएचा फरक एप्रिलच्या वेतनात दिला जाईल.