गोव्यात रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या घटनांत वाढ, चालू वर्षात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Updated: October 22, 2023 16:38 IST2023-10-22T16:38:01+5:302023-10-22T16:38:15+5:30
कोकण रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे.

गोव्यात रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या घटनांत वाढ, चालू वर्षात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू
मडगाव: गोव्यात रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या घटना वाढू लागल्या असून, चालू वर्षात आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर २७ जण रेल्वे खाली सापडून मरण पावले आहेत. कोकण रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे. या वर्षाच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातील ही आकडेवरी आहे. यातील २३ जण प्रत्यक्षात रेल्वेखाली सापडले आहे तर ४ जणांना रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. नउ मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. तर १८ मृतदेहांची ओळख पटली आहे.
कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव रेल्वे स्थानक ते दामोदर महाविदयालय गेट या दरम्यान सर्वात जास्त प्रकरणे घडतात. येथे रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या एकूण १२ प्रकरणे घडली आहेत. तर रेल्वेखाली येउन आत्महत्या करणाच्या घटना मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे मार्गावर घडलेल्या आहेत.
लोकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये असे आवाहनही कोकण रेल्वे पोलिसांनी केले आहे. अनेकदा रेल्वे येत असताना गेट पडलेली असतानाही लोक रेल्वेरुळ ओलांडण्याचे प्रयत्न करतात, हे धाडस मृत्यूच्या दारात नेणारे ठरते. लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे