पणजी : राज्यातील ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतींची खर्च करण्याची जी क्षमता व मर्यादा आहे, ती वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी गोवा पंचायत राज कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. काही ग्रामपंचायती अजूनही भाड्याच्या जागेत आहेत. या पंचायती दरमहा केवळ एक हजार रुपयेच भाड्यावर खर्च करू शकतात, अशी मर्यादा होती. ग्रामसभेवर खर्च करण्याची अगोदर तरतूदच नव्हती. आता ग्रामसभेसाठी तीन हजार रुपयांचा खर्च करता येतो, अशी तरतूद करण्यात आली. तसेच पंचायतीच्या स्थायी समितीवरील सदस्याला ३०० रुपयांचा भत्ता मिळणार आहे. ग्रामपंचायती किंवा जिल्हा पंचायती ६० हजार रुपये खर्च करून दुचाकीही खरेदी करू शकतील. (पान २ वर)
पंचायत, जि.पं.च्या खर्च मर्यादेत वाढ
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST