शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी फार्मा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर आयकरच्या धाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 14:42 IST

वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले.

पणजी : कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी आयकर खात्याच्या अधिकाय्रांनी राज्यातील फार्मास्युटिकल तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर धाडी घालून गेल्या तीन-चार दिवसात करोडो रुपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.

वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले. यातील एक फार्मास्युटिकल कारखान्यात कोविड चांचणीसाठी किट बनवण्यात येते. देशी व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत या कोविड चाचणी किटचा पुरवठा केला जातो. म्हापसा येथील अन्य एक फार्मा उद्योग औषधे बनवून देश, विदेशात विकतो.

आयकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपसात असे आढळून आले आहे की, खरे उत्पन्न लपवण्यासाठी काही कंपन्यांनी बोगस बिले वापरली.

दरम्यान, आठ वेगवेगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची व दोन हॉटेल उद्योग समुहांचीही झडती घेण्यात आली. या कंपन्या बडे विवाह समारंभ आयोजित करत होते. या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचे आढळून आले आहे. दिवाडी, दोनापॅाल, करंझाळे, पर्वरी, पाटो व मळा येथील इव्हेंट कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या.

दरम्यान, गोवा राज्य फार्मा हब म्‍हणून ओळखले जाते. देशभरात उत्पादन होणाय्रा औषधांपैकी १२ टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात व ७० टक्के निर्यात केली जातात, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या अंदाजे ८० फार्मास्युटिकल युनिट्‌समधून दरवर्षी सुमारे १४  हजार कोटींची उलाढाल केली जाते. दरवर्षी सुमारे ११ हजार कोटींच्या औषधांची निर्यात केली जाते आणि अन्य उत्पादने भारतात विकली जातात अशीही अधिकृत माहिती आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Taxइन्कम टॅक्सraidधाड