शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

गँगवॉरमध्ये पंजा कापला गेलेल्याचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 14:44 IST

गोव्यात गुंडगिरीला किती ऊत आला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे जुने गोवा येथे झालेले कोयता व दगड  घेऊन झालेले गँगवॉर.

पणजी:  जुने गोवे गँग वॉर मध्ये हात कापला गेलेला युवक कृष्णा कुट्टीकर याचे गोमेकॉत निधन झाले. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदला गेला आहे. 

गोव्यात गुंडगिरीला किती ऊत आला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे जुने गोवा येथे झालेले कोयता व दगड  घेऊन झालेले गँग वॉर. या हल्ल्यात कृष्णा कुट्टीकर याचा हाताचा पंजा कापला गेला होता.  गोमेकॉत दाखल करून त्याच्यावर उपचारही चालविले होते. रक्तवाहिनी तुटल्या गेल्यामुळे त्याचा खूप रस्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच खालावली होती. मंगळवारी रात्री त्याची प्रकृती खूपच चिंताजनक बनली होती आणि बुधवारी दुपारी त्याचे निधन झाले. गोमेकॉतील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. 

कुट्टीकर याच्या निधनामुळे या प्रकरणाला आता हे प्रकरण गांभिर्यामने घेणे पोलिसांना आणि प्रशासनालाही भाग आहे. स र्व चारही संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुळ एफआयआरमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गँगवॉरची सुरूवात झाली होती ताळगाव येथे व तेथे चारही संशयितांनी तक्रारदाराच्या गटातील युवकांवर हल्ला करून ते रायबंदरच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर या युवकांनी त्यांचा पाठलाग केला होता.

रायबंदर येथे त्यांना संशयितांकडून अडवून कोयता व दगड घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यातच कृष्णा कुट्टीकर याच्यावर कोयत्याचा वार करण्यात आला व तो त्याच्या हाताच्या पंजावर पडला आणि पंजा कापला गेला होता.  हल्लेखोरांची नावे  जॅक ऊर्फ मानुएल ओलिवेरा, कमलेश कुंडईकर, मनिष हडफडकर आणि गौरिश बांदोडकर अशी आहेत. गौरिशला पणजी पोलिसांनी तर इतर तिघांना जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांना ८ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी