शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मालवणातील बेकायदा एलईडी मासेमारीचे प्रकरण गोव्याचे आमदार सिल्वेरा यांना महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 20:19 IST

ट्रॉलर प्रकरणात गोव्याचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना महाराष्ट्र महसूल अधिका-यांकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे

पणजी : मालवण समुद्रात एलईडी दिवे वापरून बेकायदेशीररित्या मासेमारी करताना जप्त केलेल्या ट्रॉलर प्रकरणात गोव्याचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना महाराष्ट्र महसूल अधिका-यांकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे. मासेमारीसाठी एलईडी दिवे वापरण्यास बंदी आहे. सिल्वेरा यांच्या मालकीचा वरील ट्रॉलर अशा प्रकारे मच्छिमारी करताना गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी मालवणमध्ये पकडला होता.ट्रॉलरवर सुमारे 60 हजार रुपये किमतीची मासळी होती. मच्छिमारी अधिका-यांनी नंतर हे प्रकरण महसूल खात्याकडे पाठवले. एलईडीद्वारे मासेमारी करणे हा गुन्हा असल्याने सिल्वेरा यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी समन्स काढले जाईल. आमदार सिल्वेरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. सरकारसाठी लज्जास्पद बाब - ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ची प्रतिक्रिया दरम्यान, ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ‘ आमदार सिल्वेरा यांचा ट्रॉलर पकडला गेला ही सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. गोव्यात एलईडी मच्छिमारीबंदी अंमलात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. अशा पद्धतीने बेकायदा मासेमारी करून गोव्यातील मत्स्य धन काही जण नष्ट करतात. काही जण सिंधुदुर्गपर्यंत जातात. सिंधुदुर्गच्या मच्छीमार खात्याच्या यंत्रणेने कारवाई करून बेकायदा मासेमारीवर अंकुश ठेवला हे योग्यच झाले.’