शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:15 IST

गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी लाँच केलेले अ‍ॅप सुरु होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आलेले जगभरातील प्रतिनिधी वैतागले आहेत.

पणजी  - गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटात इफ्फी अ‍ॅपचे लाँचिंग केले जाते. यंदाही एका स्वतंत्र कार्यक्रमात इफ्फी अ‍ॅप लाँच केले गेले, मात्र महोत्सव सुरु होउन दोन दिवस उलटले तरी हे अ‍ॅप सुरु होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आलेले जगभरातील प्रतिनिधी वैतागले आहेत.प्रतिवर्षी इफ्फीसाठी अ‍ॅपचे लाँचींग केले जाते. यामधून अ‍ॅन्ड्राईड व्हर्जन असलेले हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून आपापल्या स्मार्ट फोनवर डाउनलोड करण्यात येते. यामध्ये चित्रपट महोत्सवाच्या सर्व घडामोडी सहजरित्या समजल्या जातात. विशेषत: कोणता चित्रपट, कोणत्या स्क्रीनवर कधी आणि केव्हा दाखविला जाणार आहे, त्यातील बदल झाले असतील तर ते काय आहेत, याची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळते. विशेषत: रोजच्या वेळापत्रकासाठी हे अ‍ॅप यूजरफ्रेंडली ठेवण्यात येत असल्यामुळे प्रतिनिधींना फारशी धावपळ करावी लागत नाही. चित्रपट, महोत्सवाच्या आयोजकांकडून होणारे वेगवेगळे कार्यक्रम, ओपन फोरममधील चर्चा, मास्टर क्लासमध्ये कोण येणार, अशा साºया कार्यक्रमांचे अपडेटस या अ‍ॅपमध्ये सहजरित्या उपलब्ध होते. याशिवाय चित्रपटांचे व्हिडिओ, लाईव्ह कार्यक्रमांसोबतच रेड कार्पेटवर येणाºया कलाकारांचे दर्शनही या अ‍ॅपद्वारे पटकन समजले जात होते.पर्यटन केंद्राची ओळख, परिसरातील हॉटेल्स, खाद्यसंस्कृती, बीच अशा साºया माहितीपूर्ण स्थळांनाही या अ‍ॅपद्वारे भेट देता येत असे. परंतु या साºयावर यंदा पाणी फिरले आहे. सोशल मिडियाचे हे व्यासपीठ इफ्फी प्रतिनिधींसाठी विशेषत: माध्यम प्रतिनिधींसाठी सोयीचे होते. या अ‍ॅपद्वारे सर्व सोशल मिडियाचे व्यासपीठ, हेल्पडेस्कसोबत प्रतिनिधी जोडले जात होते. परंतु महोत्सव सुरु होउन दोन दिवस उलटले तरी हे अ‍ॅप अद्यापही अ‍ॅक्टिव्ह झालेले नाही. प्रतिनिधींचे नाव आणि नोंदणी केलेला ई मेलइफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले आयडी टाकूनही हे अ‍ॅप सुरुच होत नाही. हेल्प डेस्ककडे याबाबत तक्रार नोंदवली असता त्यांनी अ‍ॅपच्या वाटेला जाउ नका, थेट इंटरनेटद्वारे गुगलवर इफ्फी २0१८ असे शोधून तिथे हवी ती माहिती मिळवा,असा सल्ला दिला जातो. इतका महत्वाचा महोत्सव आणि इतक्या छोट्या गोस्टींसाठी जगभरातील प्रतिनिधींना तक्रार करावी लागते, यासारखे दुर्देव नाही.आॅनलाईन तिकिट काढण्याला मर्यादाप्रतिनिधींना आॅनलाईन तिकिट काढण्यासाठी तर हे अ‍ॅप अतिशय फायद्याचे होते. बसल्याजागी हव्या त्या चित्रपटाचे तिकिट अ‍ॅपद्वारे काढता येत होते. परंतु अ‍ॅपच अस्तित्वात नसल्यामुळे आॅनलाईन तिकिट काढता येत नाही.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा