शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फी अधिक चांगल्या प्रकारे होईल : अभ्यंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 12:30 IST

केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रलय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी इफ्फीचे आयोजन करते.

- सद्गुरू पाटील

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्याबाबतचा अनुभव गोव्याच्या यंत्रणेला बऱ्यापैकी मिळालेला आहे. त्यामुळे यावेळी पणजीत इफ्फी अधिक चांगल्या प्रकारे पार पडेल, असा विश्वास गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर(आयएएस) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला.

केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रलय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी इफ्फीचे आयोजन करते. 2003 सालापासून गोव्यात इफ्फी होत आहे. अभ्यंकर म्हणाले, की गोव्यात इफ्फीमुळे सिनेमाची संस्कृती निर्माण झालेली आहे. चांगल्या दर्जाचे कोंकणी चित्रपट अलिकडे तयार झाले. जागतिक तोडीचे काही सिनेमा इथे साकारले. गोव्याची लोकसंख्या कमी असली तरी, या भागात खूप मोठे कलाकार, विचारवंत निर्माण होत आहेत. डी. डी. कोसंबीपासून अन्य विचारवंतांची नावे त्यासाठी घेता येतील. एकंदरीत ही भूमी सिने, कला यासाठी पोषक आहे व एकूणच सजर्नशीलतेला येथे खूप वाव आहे.

अभ्यंकर म्हणाले, की मुंबई व अन्य ठिकाणचे पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओ आता गोव्यात येत आहेत. गोव्यात सिनेमांचे चित्रिकरणही वाढलेले आहे. सिनेफाईल हा चित्रपट रसिकांचा स्वतंत्र क्लब येथे चालतो. तो आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झालेला आहे. त्यासाठी सरकारला पैसा खर्च करावा लागत नाही. इफ्फी विविध अर्थानी गोव्यासाठी उपयुक्त व मदतरुप ठरत आहे. वार्षिक सरासरी 15 ते 20 कोटी रुपये इफ्फीच्या आयोजनावर खर्च करावे लागतात पण हा खर्च वाया जात नाही. येथील अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे ब्रँडिंग होत आहे. 

अभ्यंकर म्हणाले, की यापूर्वीचे इफ्फी आयोजित करताना ज्या त्रुटी आढळून आल्या त्या यावेळी दूर झालेल्या असतील. त्यामुळेच प्रसार माध्यमांमधील प्रतिनिधींना स्वतंत्रपणो इफ्फी कार्डे एखाद्या हॉटेलमध्ये दिली जातील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटर असेल. दि. 20 नोव्हेंबरपासून इफ्फीला आरंभ होईल.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा