शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

हिंमत असल्यास 21 आमदारांसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी जावे : विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:53 IST

गोव्यात काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी धडपड करीत आहे. मात्र काँग्रेसकडे संख्याबळ नसताना ते सरकार घडवण्याचा दावा करीत आहेत.

पणजी : गोव्यात काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी धडपड करीत आहे. मात्र काँग्रेसकडे संख्याबळ नसताना ते सरकार घडवण्याचा दावा करीत आहेत. काँग्रेसकडे कोणतेच विषय नाहीत. गोव्यात केवळ भाजपा आघाडीचे सरकार सत्तेत राहणार आहे. काँग्रेसला हिंमत असल्यास त्यांनी खुशाल राज्यपाल मुदृला सिन्हा यांच्याकडे २१ आमदारांसोबत जाऊन सरकार घडवून दाखवावे. भाजपाकडे बहुमत असून काँग्रेसने कितीही आटापीटा केला तरीही त्यांचे सरकार घडू शकत नाही, अशा शब्दात गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

राज्य सराकरकडून मुधमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुरुवारी पणजीत ‘चेजिंग डायबटीज बॅरोमीटर’च्या लॉन्चिंग कार्यक्रम आयोजिला होता. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले. राणे म्हणाले, राज्यातील सरकार स्थिर असून नेत्वृत्त बदलाची गरजच का? आमचे मुख्यमंत्री पर्रीकर असल्याने नेतृत्त्व बदलाचा विषय उपस्थित होत नाही. घटक पक्षही भाजपसोबत असून काळजीचे कारण नाही. विरोधक उगाच नेत्वृत्त बदलाची भाषा करत आहे. आज मी वर्तमानपत्रात वाचले की, काँग्रेसचे चेल्लाकुमार यांनी केंद्रातून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आणला आहे. जर काँग्रेसकडे संख्याबळ आहे, तर मग काँग्रेसवाले भाजपच्या आमदरांना फोन का लावतात? आम्ही इथे भाजपा पक्ष सोडण्यास आलो नसून आम्ही भाजपसोबतच राहणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

राणे म्हणाले, केंद्रातून जे भाजपाचे निरीक्षक आले होते, तेव्हाही नेतृत्त्व बदलण्याचा प्रश्न उपस्थित झाला नव्हता. सरकार व्यवस्थितपणे चालत असून कोणतेही काम रखडलेले नाही आहे. वेळेनुसार सगळ्या फाईल्स हातवेगळ्या होत आहेत. त्यासाठी ई-मेल व अन्य तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री राज्यात नसल्याने सरकारी कामे खोळबंली आहेत, अशा निरर्थक बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन राणे यांनी केले.

 ते म्हणाले, नेतृत्त्व बदलण्याचा विषय असल्यास तो भाजपची केंद्रीय समिती व स्थानिक तसेच राष्टीय अध्यक्ष ठरवतील. यासाठी भाजपच्या घटक पक्षांचे मतही घेतले जाईल. त्यामुळे उगाच नेतृत्त्व बदलाच्या वलगना करू नयेत. माझे मुख्यमंत्री पर्रीकर अजुनही आहेत. येत्या सोमवारी त्यांची विचारपूस करण्यास मी दिल्लीला जाणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु असल्याने सर्व काही संपले, असे होत नाही. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा