हेल्मेट घातले नाही, तर दंडाची पावती घरपोच!
By Admin | Updated: April 2, 2015 02:09 IST2015-04-02T02:07:21+5:302015-04-02T02:09:19+5:30
पणजी : वाहतूक पोलिसाला चुकवून तालांव चकविले, तर दंड चुकणार, हा समज चुकीचा ठरणार आहे; कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या

हेल्मेट घातले नाही, तर दंडाची पावती घरपोच!
पणजी : वाहतूक पोलिसाला चुकवून तालांव चकविले, तर दंड चुकणार, हा समज चुकीचा ठरणार आहे; कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना घरपोच दंडाची पावती पाठविली जाणार आहे.
पोलीस खात्याचे वाहतूक उपअधीक्षक धर्मेश आंगले म्हणाले की, राज्यात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाईल. हेल्मेट न वापरणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल आणि त्याची पावती घरपोच केली जाईल. त्यामुळे हेल्मेट न वापरून वाहतूक पोलिसांना किंवा आरटीओला चकविण्याचे प्रयत्न करूनही काही फायदा होणार नाही.
रस्त्यावर उभा असलेले वाहतूक पोलीसच वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावत होते. नो पार्किंगच्या जागी ठेवलेल्या वाहनांना दंड देण्यासाठीही सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जात होता; पण आता हेल्मेट न वापरणाऱ्यांनाही दंड देण्यात त्याचा वापर केला जाणार असल्यामुळे हेल्मेट वापरण्याकडे लोकांचा कल असेल, अशी वाहतूक खात्याची अपेक्षा आहे.
(प्रतिनिधी)