दक्षिण जिल्हाधिकारीपदीही आयएएस
By Admin | Updated: February 7, 2015 01:53 IST2015-02-07T01:49:34+5:302015-02-07T01:53:18+5:30
पणजी : सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल करताना दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी सचिन शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

दक्षिण जिल्हाधिकारीपदीही आयएएस
पणजी : सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल करताना दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी सचिन शिंदे यांची नियुक्ती केली आहे. पालिका प्रशासन संचालकपदावरून एल्विस गोम्स यांना हटवून वेनान्सियो फुर्तादो यांची वर्णी लावण्यात आली आहे.
एल्विस गोम्स यांना तुरुंग महानिरीक्षकपदी पाठवले आहे. गोम्स यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या. नीलेश फळदेसाई यांना आयटी संचालकपदावरून हटवून इन्फोटॅक महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी पाठवले आहे.
दिल्लीत गोवा सदनच्या निवासी आयुक्तपदी आयएएस अधिकारी मोहन लाल यांना पाठवण्यात आले आहे. पर्यटन संचालक आएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांच्याकडे वित्त-बजेट खात्याचे खास सचिवपद, आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिवपद सोपविण्यात आले आहे.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी अधिकारी नीला मोहनन् या आयएएस अधिकाऱ्याला आणल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षिण
गोव्यातही आयएएस अधिकारी आणू, असे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.
(प्रतिनिधी)