मीच करोलला भोसकून त्याचे तुकडे तुकडे केले!
By Admin | Updated: January 5, 2016 02:06 IST2016-01-05T02:06:06+5:302016-01-05T02:06:24+5:30
पणजी : आमोणे येथील उसाचा रस विकणारा रतन करोल याचा खून आपणच केल्याची कबुली संशयित दत्तगुरू सिनारी

मीच करोलला भोसकून त्याचे तुकडे तुकडे केले!
पणजी : आमोणे येथील उसाचा रस विकणारा रतन करोल याचा खून आपणच केल्याची कबुली संशयित दत्तगुरू सिनारी याने दिली आहे. करोलचा आपल्या स्वीफ्ट कारमध्येच सुरा भोसकून खून केला आणि नंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या शरीराचे चार तुकडे केले. त्यानंतर पुलावरून ते फेकून दिले, अशी कबुली त्याने दिली आहे.
ज्या दिवशी करोलचे त्याच्या उसाच्या रसाच्या गाड्यावरून अपहरण करण्यात आले होते, त्याच दिवशी त्याचा सिनारी बंधूंकडून खून करण्यात आला होता. कारमध्ये बसलेल्या अवस्थेत त्याच्या छातीत सुरा खुपसण्यात आला आणि तेथेच करोलने प्राण सोडले होते, अशी कबुली संशयित दत्तगुरू सिनारीने पलिसांना दिली. आपणच त्याच्या छातीत सुरा खुपसल्याचे त्याने सांगितले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते आणि त्यामुळेच करोलचा काटा काढण्यात आला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करोलचे अपहरण करण्यात आले आणि त्याच दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला भोसकण्यास आले. त्यानंतर सर्व उरकून रात्री दहा (पान ६ वर)