माशेलात पत्नीकडून पतीचा खून
By Admin | Updated: October 28, 2015 02:12 IST2015-10-28T02:12:12+5:302015-10-28T02:12:21+5:30
फोंडा : दारूच्या व्यसनात बुडालेल्या पतीला पत्नीने रागाच्या भरात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना माशेल येथे मंगळवारी घडली. फोंडा पोलिसांनी

माशेलात पत्नीकडून पतीचा खून
फोंडा : दारूच्या व्यसनात बुडालेल्या पतीला पत्नीने रागाच्या भरात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना माशेल येथे मंगळवारी घडली. फोंडा पोलिसांनी संशयित महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पती आणि पत्नीमधील भांडणात
त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला आई-बापाविना पोरके होण्याची वेळ आल्याने भोम भागात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरचावाडा-भोम येथील तातू दुगू भोमकर (वय ३१) हा युवक कामधंदा न करता सदैव दारूच्या नशेत राहायचा. नशेत असताना तो पत्नी अमिता (वय २२) व अडीच वर्षांच्या मुलाला मारहाण करायचा. मंगळवारी सकाळपासून तो बेपत्ता होता. अमिता त्याचा शोध घेत असता, तो माशेल येथील तिवरे-वरगाव पंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या अर्धवट स्थितीतील घरात दारूच्या नशेत झोपल्याचे तिला आढळून आले. या वेळी तिने रागाच्या भरात तेथीलच दांडा घेऊन त्याला मारायला सुरुवात केली. या दरम्यान तातू हा अकस्मात उठल्यामुळे एक तडाखा त्याच्या डोक्यावर बसला. त्या आघाताने तो खाली पडला. या वेळी अमिताचा लहान मुलगा रडू लागल्यामुळे ती त्याला घेऊन जवळच्या हॉटेलात गेली व तेथील कर्मचाऱ्यांना आपण पतीला मारहाण केल्यामुळे तो निपचित पडल्याची माहिती दिली.
हॉटेलचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता, तातू हा निपचित पडला होता. मात्र, त्याचा श्वास चालू होता. त्यामुळे तातडीने १0८ रुग्णवाहिका बोलावून त्याला बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दरम्यान, अमिता हिने आपल्या दिराला या प्रकाराची कल्पना दिली.
फोंडा पोलिसांना याबाबतचे वृत्त कळताच निरीक्षक सुदेश नाईक, उपअधीक्षक सुनीता सावंत, उपनिरीक्षक विक्रम नाईक, सिनारी यांनी बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मृतदेहाचा
पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी
बांबोळीतील गोमेकॉत पाठवून दिला.
फोंडा पोलिसांनी संशयित अमिता भोमकर हिला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा
गुन्हा दाखल झाला आहे, असे निरीक्षक सुदेश
नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)