शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुकर्मे लपविण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून: संशयिताला अटक

By सूरज.नाईकपवार | Updated: March 27, 2024 18:32 IST

त्या प्रियकराचा शोध चालू.

सूरज नाईकपवार ,मडगाव: आपली कुकर्मे लपविण्यासाठीच पत्नीने आपला पतीचा प्रियकराच्या मदतीने  खून केल्याची खळबळजनक गोव्यातील सासष्टीतील पेडा बाणावली येथे घडली.  विश्वनाथ सिंदाल (३५) असे मयताचे नाव असून, या खून प्रकरणात येथील कोलवा पोलिसांनी तिची पत्नी  वैभवी उर्फ मंगलला अटक केली आहे. तर तिच्या प्रियकराचा सदया शोध चालू आहे. त्याच्या शोधासाठी कोलवा पोलिसांचे एक पथक कर्नाटकातील खानापुर येथेही पाठवून देण्यात आले आहे. पेडा बाणावली येथे खुनाची वरील घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित वैभवी हिच्याविरोधात भांदसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे. मंगला हिचे एका युवकाकडे अनैतिक संबध हाेते. त्याबाबत विश्वनाथला चाहूल लागली होती. उभयंतामध्ये त्यावरुन वारवांर खटकेही उडत होते. या दोघांना एक चारवर्षाची लहान मुलगीही आहे. खुनाच्या घटनेनंतर वैभवी त्या मुलीला घेउन सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडून खानापूर येथे आपल्या माहेरी गेली होती. खुनाची वरील घटना रविवारी घडली होती. विश्वनाथ हा भाडयाच्या घरात रहात होता.

मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. घटनास्थळाहून एक युवक विश्वनाथ याची दुचाकी घेउन जातानाची छबी रस्त्यावरील सीसीटिव्हीत टिपली गेली होती. पोलिसांना तपासासाठी हा एक महत्वाचा आधार ठरला आहे. मयत विश्वनाथ हा टाईल्स फीटरचे काम करीत होता. त्याची आई सुरावली येथे रहात आहे. मंगळवारी दुपारी त्या आपल्या मुलाला जेवण घेउन आली असता, तिला हा प्रकार दिसून आला. नंतर तिने शेजाऱ्यांना बोलावून घेउन पोलिसांकडे तक्रार केली होती.

खुनाच्या घटनेनंतर वैभवी या परत गोव्यात आल्या होत्या. आपण पतीला वारवांर फोनवरुन संपर्क साधला मात्र पलिकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिंता होउन आपण येथे आल्याचे तिने सुरुवातीला पोलिसांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शेवटी आपल्या खाक्या दाखविल्यानतंर तिने सर्व बाबी उघड केल्या.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस