महिला वाचवताहेत पती, मुलाचा जीव
By Admin | Updated: June 20, 2014 02:42 IST2014-06-20T02:40:54+5:302014-06-20T02:42:59+5:30
सद्गुरू पाटील ल्ल पणजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे.

महिला वाचवताहेत पती, मुलाचा जीव
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. राज्यातील अनेक महिला कधी आपल्या मुलाला तर कधी पतीला वाचविण्यासाठी किडनी दान करण्यास पुढे येतात. गोमेकॉ इस्पितळात आतापर्यंत किडनी रोपणाच्या आठ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहेत. आठपैकी बहुतांश प्रकरणी महिलांनीच आपली प्रत्येकी एक किडनी देऊन पुरुषास जीवनदान दिले आहे.
किडनी रोपण शस्त्रक्रियेसाठी अगोदर मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टारांना गोमेकॉ इस्पितळात आणावे लागत होते. त्यांच्या मार्गदर्र्शनाखाली गोमेकॉतील डॉक्टरांचे पथक शस्त्रक्रिया करत होते. आता गोमेकॉतील डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई व अन्य डॉक्टर्स मिळून किडनी रोपण यशस्वी करत आहेत. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ही शस्त्रक्रिया चालते. एखादी व्यक्ती किडनी दुसऱ्यास दान करण्यासाठी तयार झाल्यानंतर कायदेशीर दृष्टिकोनातूनही काही सोपस्कार पार पाडावे
लागतात. आता आणखी तीन व्यक्ती किडनी दान करण्यासाठी तयार झालेल्या आहेत.
या प्रतिनिधीला डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले, की गोमेकॉत येत्या महिन्यात किडनी रोपणाच्या आणखी तीन शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. तीन व्यक्तींपैकी दोन महिला आहेत. या दोन महिलांनी पुरुषांचे जीव वाचविण्यासाठी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत.