चक्रीवादळाचा धोका
By Admin | Updated: June 8, 2015 00:43 IST2015-06-08T00:42:59+5:302015-06-08T00:43:11+5:30
पणजी : गोव्यापासून सुमारे ६५० किलोमीटरवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा धोका
पणजी : गोव्यापासून सुमारे ६५० किलोमीटरवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ झाल्यास ते वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेने सरकणार असल्याचे भाकीत केले असले तरी गोव्यासह भारतीय किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे.
गोव्याच्या किनाऱ्यापासून ६५० किलोमीटरवर तसेच दक्षिण मुंबईहून ६९० किलोमीटरवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी हा बदल आढळल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. कमी दाबाने चक्रीवादळाचे स्वरूप घेतले नसल्याची माहिती हवामान खात्याच्या पणजी केंद्राच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी दिली. रविवारी सकाळी ही प्रक्रिया सुरू झाली आणि संध्याकाळी गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील किनारी भागात जोरदार पाऊस पडला. सुरुवातीस वादळी वारा व त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सर्वच किनारी भागांत हा पाऊस पडला.
१४.५ उत्तर अक्षांश व ६८.५ पूर्व रेखांश मध्ये या हालचाली टिपल्या आहेत.
(पान २ वर)