मोपा विमानतळावर स्थानिकांना किती रोजगार?
By Admin | Updated: December 4, 2014 01:18 IST2014-12-04T01:17:53+5:302014-12-04T01:18:59+5:30
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना किती प्रमाणात रोजगार मिळेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे.

मोपा विमानतळावर स्थानिकांना किती रोजगार?
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना किती प्रमाणात रोजगार मिळेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे. तथापि, लहान-मोठ्या रोजगार संधी पेडणे तालुक्यातील लोकांना मिळाव्यात म्हणून विमानतळावरील कामासाठी आवश्यक असे अभ्यासक्रम आयटीआय व अन्य तत्सम संस्थांमध्ये सुरू करण्याचा विचार सरकारने चालवला आहे.
‘दाबोळी’वर अनेक परप्रांतीयांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. मोपा विमानतळानिमित्तानेही नोकऱ्यांसाठी परप्रांतीय पेडण्यात येतील. मात्र, त्याचबरोबर स्थानिकांनाही काही रोजगार संधी मिळतील. लहान-मोठे कंत्राटही मिळू शकते.
मोपा विमानतळाबाबत इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या कंपनीने जो ईआयए अहवाल तयार केला आहे, त्यावरून रोजगार संधींच्या प्रमाणाची ढोबळमानाने कल्पना येते. मोपा येथे केवळ विमानतळ होणार नाही तर गोल्फ कोर्स, हॉटेल्स, बिझनेस
सेंटर असे प्रकल्पही उभे राहतील. त्यामुळेही थोड्या रोजगार संधी तयार होतील. (खास प्रतिनिधी)