‘गृह आधार’चे मानधन होणार दीड हजार रुपये
By Admin | Updated: December 23, 2015 01:47 IST2015-12-23T01:46:27+5:302015-12-23T01:47:05+5:30
‘गृह आधार’चे मानधन होणार दीड हजार रुपये

‘गृह आधार’चे मानधन होणार दीड हजार रुपये
पणजी : गृह आधार योजनेखाली महिलांना दिले जाणारे मासिक मानधन १२०० रुपयांवरून दीड हजार रुपये केले जाणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले आहे.
पुढील आर्थिक वर्षात मानधन वाढविण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
सांगे तालुक्यात नेतुर्ली येथे कृषी मेळाव्यात आदिवासी योजना जागृती मोहिमेचे उद््घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सध्या १ लाख ३५ हजार ७०३ महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असून उसासाठीचा आधारभूत दर १२०० रुपये प्रति टनांवरून १३०० रुपये प्रति टन करण्यात आलेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अटल ग्राम योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. कृषी विषयासाठी विविध प्रयोगांसाठी सांगे तालुक्याकडे प्राधान्यक्रमे पाहिले जाते. सांगेतील शेतकरीच संजीवनी साखर कारखाना नफ्यात आणू शकतात, असे पार्सेकर म्हणाले.
(पान ४ वर)