शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने राज्याला झोडपले, दरडी कोसळल्या, पूल बुडाले

By वासुदेव.पागी | Updated: July 7, 2024 15:55 IST

पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या. 

पणजीः जोरदार पावसाने राज्याला झोडपून टाकताना रविवारी अवघ्या ५ तासांत सरासरी ४ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. जुने गोवेत पावसाचा कहर होऊन ७ तासात ६ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे हंगामी पावसाने इंचाचे अर्धशतक पार केले आहे. पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या. 

वास्तविक शनिवारी फार पाऊस पडला नाही. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात केवळ २ इंचच पाऊस पडला. परंतु त्यानंतर पावसाने रौद्ररूप घेत राज्यातील जनजीवन विस्कळीत केले. कोने प्रियोळ येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्यामुळे  रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. वाहतुक फर्मागुडी ते म्हार्दोळ तसेच पीईएस महाविद्यालय ते गोवा अभियांत्रिक महाविद्यालय या मार्गांनी वळविण्यात आली. 

गुडी पारोडा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे धोकादायक स्थिती बनली होती. वाहतूक पोलिसांनी दक्षता बाळगताना वेळीच त्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्या.  पावसाबरोबर सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बिट् पिलानी जवळील वाहतूक बेराकेट्स उडून रस्त्यावर विखुरले गेले. वाहतुकदारांसाठी अत्यंत धोकादायक बनलेले हे बेरेकेट्स वाहतुक पोलिसांनी वेळीच हटविले.  जुने गोवे व पिळर्णमध्ये जोरदारभारतीय हवामान खात्याच्या स्वयंचलीत यंत्रणेच्या नोंदीनुसार सकाळी ८.३० ते संध्याकाळी ३.३० पर्यंतच्या ७ तासात सर्वाधिक पाऊस हा जुने गोवे येथे ६.४१ इंच इतका पडला तर पिळर्ण येथे ५ इंच इतका कोसळला. काणकोण आणि मुरगावात २ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. आजच्या पावसामुळे एकूण सरासरी पाऊस  ५० इंच पार झाला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस