मुसळधार पावसाने झोडपले

By Admin | Updated: July 2, 2015 01:33 IST2015-07-02T01:33:30+5:302015-07-02T01:33:39+5:30

पणजी : संततधार पावसाने बुधवारी गोव्याला झोडपून काढले. दिवसभरात राजधानी पणजीत दीड इंच पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये

Heavy rains lashed | मुसळधार पावसाने झोडपले

मुसळधार पावसाने झोडपले

पणजी : संततधार पावसाने बुधवारी गोव्याला झोडपून काढले. दिवसभरात राजधानी पणजीत दीड इंच पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले. पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. आगामी चार दिवस पावसाचा जोर राहील. पुढील २४ तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे.
गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून संततधार चालू होती. त्यानंतर बुधवार सकाळी एक ते दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा जोर धरला. दुपारी शाळा सुटण्याच्यावेळीच मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे अक्षरश: हाल झाले.
बुधवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत २४ तासांत राज्यात सरासरी दीड इंच पाऊस झाला. या २४ तासांच्या कालावधीत केपेत सर्वाधिक २.९१ इंच पाऊस झाला. साखळीत एकू ण मोसमी पाऊस ४0 इंचांवर पोहोचला आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झालेला आहे. सरासरी ९११.६ मि. मि. पाऊस अपेक्षित होता; परंतु ७९३.७ मि.मि. पावसाची नोंद झाली.
आल्तिनो येथील हवामान वेधशाळेच्या संचालिका व्ही. के. मिनी यांना विचारले असता, मान्सूनच दुसरा टप्पा सक्रिय झाला असून पुढील चार दिवस पावसाचा जोर राहील, असे त्यांनी सांगितले. गुजरात किनारपट्टीपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे. राजधानी पणजीत आंबेडकर उद्यानाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता दिवसभरात आठ कॉल्स आल्याचे सांगण्यात आले. कोंब, मडगाव येथे घराला आग लागून सुमारे साडेतीन लाख रुपयांची हानी झाली. सकाळी ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rains lashed