शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; ठिकठिकाणी झाडांची पडझड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:24 IST

तसेच हवामान खात्याने लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे...

नारायण गावस -पणजी: राज्यात शनिवारी आणि रविवार मुसळधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तसेच हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केल्याने पावसाचा जोर कायम राहणार आहे. कुठलाच अनुसुचित प्रकार घडल्यास आपत्कालीन विभागाने हेल्पलाईन क्रमांक ( ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३९८, ०८३२२७९४१००) जारी केला आहे. तसेच हवामान खात्याने लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

२४ तासांत मडगावात ६ इंच पाऊसकाल शनिवार पासून पावसाने जाेर धरला आहे. उत्तर गाेव्यापेक्षा दक्षिण गोव्यात पावसाचा जोर मोठा आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण गोव्यापैकी मडगावात सर्वाधिक जास्त पाऊस पडला. गेल्या २४ तासांत मडगावात ६ इंच पावसाची नोंद झाली आहे तर काणकाेणात ३.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राजधानी पणजीत गेल्या २४ तासांत २ इंच पावसाची नाेंद झाली आहे. आजही पावसाचा जोर कायम असणार आहे. तर पुढील दाेन दिवस राज्यात ऑरेज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे.

अनेक ठिकाणी आला पूरदाेन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. पणजी शहरात तर अनेक रस्त्यावर पाणी  साचले होते. काही नद्यांना पूरही आला. ठिकठिकाणी  रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही लोकांच्या घरात पावसाच्या पुराचे पाणी गेले होते. गेले दाेन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लाेकांची तारांबळ उडाली.  राज्यातील शहरापासून ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण झाली होती.

ठिकठिकाणाी पडझडजाेरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाण माेठी पडझड झाली. माेठ्या प्रमाणात रस्त्यावर तसेच लोकांच्या घरावर झाडे तसेच झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.  तर काही ठिकाणी वीज खांबही पडले हाेते. काही ठिकाणी झाडे तसेच फांद्या गाड्यावर पडून गाड्यांचे मोठे नुकसान हाेण्याच्या घटना घडल्या.  या पडझडीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन  दल तसेच आपत्कालीन विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन  घटनांचा आढावा घेतला.

सतर्क राहण्याचा इशाराराज्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात रेड अर्लटजारी असल्याने आज जाेरदार पावस पडत आहे. अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नदी नाले तलाव तसेच समुद्र किनारी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतांश भागात नद्यांना आता पूर यायला लागला आहे. 

 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस