पंचायत आरक्षणावरून हलकल्लोळ
By Admin | Updated: May 17, 2017 02:40 IST2017-05-17T02:37:03+5:302017-05-17T02:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील ग्रामपंचायतींची प्रभाग रचना वादाची ठरल्यानंतर आता प्रभाग आरक्षणाची प्रक्रियाही गोंधळ उडविणारी ठरली आहे.

पंचायत आरक्षणावरून हलकल्लोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्यातील ग्रामपंचायतींची प्रभाग रचना वादाची ठरल्यानंतर आता प्रभाग आरक्षणाची प्रक्रियाही गोंधळ उडविणारी ठरली आहे. भाजपप्रणित आघाडी सरकारचा भाग असलेला मगो पक्षही प्रभाग आरक्षणाबाबत तीव्र नाराज झाला आहे. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी मंगळवारी व्यक्त केली आहे.
प्रत्येक पंचायतीत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण मिळायला हवे. मात्र, तसे न करता काही पंचायतींमध्ये चक्क ५0 टक्के, तर काही पंचायतींमध्ये कमी प्रमाणात आरक्षण देण्यात आले आहे. जी पंचायत ९ सदस्यीय आहे, तिथे ओबीसींसाठी ९ पैकी ४ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत, तर ११ सदस्यीय पंचायतीत मात्र दोनच प्रभाग ओबीसींना देण्यात आले आहेत.
दीपक ढवळीकर म्हणाले की, राजकीय वशिलेबाजीने प्रभाग आरक्षण करण्यात आल्याचा संशय काही पंचायतींबाबत येतो. असमान पद्धतीने प्रभाग आरक्षण दिले गेले आहे. बेतकी खांडोळा ही पंचायत ९ सदस्यीय असून तिथे चार प्रभाग ओबीसींसाठी, तर वेलिंग-प्रियोळ ही
पंचायत ११ सदस्यीय असून देखील तिथे केवळ दोनच प्रभाग ओबीसींना आरक्षित करण्यात आले आहेत.