शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेटर पणजी पीडीतून गावे वगळली, फक्त ताळगाव व कदंब पठार राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:16 IST

सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी : सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त कदंब पठार आणि ताळगावचा भाग हा पीडीएमध्ये राहील. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली.मंत्री सरदेसाई म्हणाले, की ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सांतआंद्रे, सांताक्रुझ व ताळगाव मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींची मान्यता सरकारने घेतली होती. आमच्या भागांसाठी पीडीए हवी अशी मागणी करणारे पत्रही तिन्ही मतदारसंघाच्या आमदारांनी दिले होते. तथापि, काही घटकांनी पीडीएविरुद्ध आंदोलन सुरू करताच दोघा आमदारांची मने बदलली. आमचा पक्ष आणि आमचे सरकार हे गोंयकारांच्या मागणीचा आदर करणारे सरकार आहे. त्यामुळे आम्ही बांबोळी पठारासह सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील जवळजवळ सगळीच गावे व भाग ग्रेटर पणजी पीडीएच्या अधिकार क्षेत्रतून वगळत आहोत. येत्या 9 रोजी नगर नियोजन मंडळाची बैठक होईल व त्यावेळी हा गावे वगळण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला जाईल.

मंत्री सरदेसाई म्हणाले, की कदंब पठार हा ग्रेटर पणजी पीडीएमध्ये राहील. ताळगावही ग्रेटर पणजी पीडीएमध्ये असेल. कारण ताळगावसाठी अगोदरच बाह्यविकास आराखडा (ओडीपी) आहे. आपण गावे पीडीएतून वगळण्याची घोषणा करून ईस्टरची भेटच लोकांना देत आहे. गोंमतकीयांचे व गोव्याचे अस्तित्व राखणो हे आमचे ध्येय आहे. काहीजणांना पीडीएची अॅलर्जी आहे, असे आम्हाला दिसते. आम्ही पीडीएविरोधकांशी चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणो 2021 च्या प्रादेशिक आराखडय़ाच्या विषयाबाबतही विरोधकांशी चर्चा करू. कोणत्या सुधारणा हव्या आहेत, काय करायला हवे ते आराखडय़ाला विरोध करणाऱ्यांनी सांगावे. यापूर्वी प्रादेशिक आराखडाच नसल्याने गोव्यात काहीजणांकडून मोठय़ा प्रमाणात ऑर्चड जमिनींचे भूखंड तयार करून ते बेकायदा पद्धतीने विकले गेले. बेकायदा पद्धतीने चालणारे बांधकामविषयक व्यवहार बंद करावेत अशी मागणी एनजीओ करतात आणि दुस:याबाजूने प्रादेशिक आराखडाही नको असे म्हणतात असे होऊ शकत नाही. सरदेसाई म्हणाले, की आम्ही पर्यावरणीयसंवेदनक्षम जागांना हात न लावता 2021 च्या आराखडय़ातील सेटलमेन्ट झोन अंमलात आणू पाहत आहोत. त्यामुळे त्यास कुणी विरोध करण्याचे कारणच असू नये.