गोव्यातही महाआघाडीची गरज

By Admin | Updated: November 9, 2015 01:27 IST2015-11-09T01:27:14+5:302015-11-09T01:27:25+5:30

गोमंतकीय जनतेला भाजपच्या थापा कळून चुकल्या आहेत. त्यामुळे महायुतीला संधी आहे. बिहारच्या बाबतीत ते म्हणाले की

Greater need for speed in Goa | गोव्यातही महाआघाडीची गरज

गोव्यातही महाआघाडीची गरज

(पान १ वरून) गोमंतकीय जनतेला भाजपच्या थापा कळून चुकल्या आहेत. त्यामुळे महायुतीला संधी आहे. बिहारच्या बाबतीत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली; परंतु केले काहीच नाही. काळे धन देशात परत आणणार, त्यामुळे प्रत्येकाला लाभ होणार अशी आशा दाखवली. मात्र, अजून केंद्र सरकार विदेशातून काळे धन परत आणू शकलेले नाही.
संहारकांविरुद्ध एकत्र
येण्याचा संदेश : डिमेलो
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले की, विरोधकांनी एकत्र यायला हवे, असा संदेश यातून मिळाला आहे. बिहारात भाजपचा पराभव झाला म्हणून येथे खुशी व्यक्त करण्यात अर्थ नाही.
धर्मांधतेला वाव देणाऱ्या भ्रष्ट तसेच संहारक राजकारण्यांविरुद्ध एकत्र यायला हवे, हाच संदेश या निकालांमधून मिळतो. गोव्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. यात युतीतील पूर्वीचा मित्रपक्ष राष्ट्रवादीलाही सोबत घ्यावे. ही युती अखेरच्या क्षणी नको, तर विधानसभा निवडणुकीला वर्षभरच बाकी असल्याने आताच झाली पाहिजे.
(प्रतिनिधी)

Web Title: Greater need for speed in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.