सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या : दिग्विजय सिंग

By Admin | Updated: August 2, 2015 03:20 IST2015-08-02T03:20:04+5:302015-08-02T03:20:15+5:30

पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदान द्यायला हवे, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय

Grant to all English schools: Digvijay Singh | सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या : दिग्विजय सिंग

सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या : दिग्विजय सिंग

पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदान द्यायला हवे, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकणी व मराठी शाळांसह इंग्रजी माध्यमातील शाळांनाही अनुदान द्यायला हवे. भाजप सरकारने इंग्रजी शाळांना अनुदान सुरूच ठेवण्याचे विधेयक विधानसभेत आणून स्वत:च्या निर्णयास कायदेशीर रूप द्यावे ही फोर्स संघटनेची मागणी रास्तच आहे. इंग्रजी शाळांसाठी जे आंदोलन झाले किंवा सुरू आहे, त्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काँग्रेसला व चर्च संस्थेला दोष देणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे दिग्विजय म्हणाले.
सीबीआय चौकशी करा
जैका प्रकल्पांशी संबंधित लुईस बर्जरच्या लाचप्रकरणी सरकारने सीबीआयमार्फत चौकशी करून घ्यावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वत: दिगंबर कामत यांच्याशी शुक्रवारी बोललो तेव्हा त्यांनी मला त्यांच्याजवळ जैकाची फाईल देखील कधी आली नव्हती हे स्पष्टपणे सांगितले. जैका यंत्रणाच प्रत्येक निविदेवर लक्ष ठेवत होती. काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही नेत्याविरुद्ध किंवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप झाला व
त्याबाबत प्राथमिक देखील पुरावा दिसला तर लगेच आमचा पक्ष कारवाई करतो. भाजप मात्र देशभरातील आपल्या सर्व भ्रष्ट मंत्र्यांना व मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांनाही पूर्णपणे पाठीशी घालत आहे, अशी टीका सिंग यांनी केली.
माविन गुदिन्हो यांना दक्षिण गोवा पीडीएचे चेअरमनपद देणे व मिकी पाशेको या आमदारास तुरुंगातून शिक्षा माफ करून मोकळे सोडणे, हे निर्णय घेणाऱ्या भाजपला नैतिकतेवर बोलण्याचा किंचितही अधिकार नाही, असे दिग्विजय सिंग म्हणाले. गुदिन्हो यांच्याविरुद्ध मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेते असताना वीज घोटाळाप्रकरणी तक्रार केली होती. अजूनही सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. माविनने मला भेटून आपण भाजपच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयातील आपले प्रकरण निभावल्यानंतर आपण पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होईन, असेही माविन मला सांगून गेले होते, असे दिग्विजय सिंग यांनी नमूद केले.
दरम्यान, शुक्रवारी राज्यात १७ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले होते. इंग्रजी शाळांच्या समर्थकांनी हे आंदोलन केले होते. त्यात अनेक पालक सहभागी झाले होते. उत्तर व दक्षिण गोव्यातील पोलीस स्थानकांमध्ये या रास्ता रोकोप्रकरणी
८ हजार अज्ञातांवर गुन्हे नोंद झाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Grant to all English schools: Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.