शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

गोविंद गावडेंची बाजू ऐकली, आता पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवू!: दामू नाईक; दिल्लीतच पुढील निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:57 IST

दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याआधी त्यांची बाजू ऐकून घ्यावी असे पक्ष नेतृत्वाने ठरवले आहे. त्यानुसार आज, सोमवारी गोविंद गावडे यांची बाजू मी ऐकून घेतलेली आहे. आता याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवणार असून दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

आज प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मंत्री गोविंद गावडे यांची बैठक झाली. या बैठकीत नाईक यांनी गावडे यांची बाजू ऐकून घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या मंत्री, आमदारांचीही बैठक पार पडली. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. गेले दोन दिवस दामू दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

दामू रविवारी रात्री गोव्यात पोचले. गावडे यांची बाजू ऐकून घ्यावी, असे ठरले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दामूंनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर बोलावले. दरम्यान, मंत्री-आमदारांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रात मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने 'संकल्प ते सिद्धी' कार्यक्रम आयोजित केला आहे. पक्षाचे केंद्रीय नेते दुष्यंत कुमार गोव्यात येणार आहेत. गेल्या अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल आम्ही तळागाळात लोकांपर्यंत माहिती पोचवणार आहोत. त्याबाबत मंत्री, आमदारांसोबत चर्चा केल्याचेही नाईक म्हणाले.

कारवाई एकतर्फी नको म्हणून चर्चा...

मंत्री गोविंद गावडे यांच्याशी मी चर्चा केली आहे. गावडे यांना मी पक्षाचे धोरण सांगितले आहे. तसेच त्यांचे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतले. पक्षाकडून कारवाई एकतर्फी व्हायला नको, त्यामुळे गावडे यांचे म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार मी त्यांच्याशी बोललो आहे. आता याबाबतचा सविस्तर अहवाल मी पाठवणार असून केंद्रीय नेतेच काय तो निर्णय घेतील.

दामूंच्या प्रश्नांची उत्तरे दिली : गोविंद गावडे

दामू नाईक यांनी घेतलेल्या बैठकीविषयी पत्रकारांनी काल मंत्री गोविंद गावडे यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यातच सांगितले की, 'दामू नाईक यांनी जे काही प्रश्न मला विचारले त्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत.' याव्यतिरिक्त कोणतेही भाष्य करण्याचे गावडे यांनी टाळले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मौन पाळणेच त्यांनी पसंत केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण