शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:26 IST

भाजप श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता, सरकारकडून अधिसूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कला व संस्कृती आणि क्रीडा खात्याचे मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना अखेर काल, बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयातून तसे जाहीरही करण्यात आले. मंत्रिमंडळातील आता एक जागा रिकामी झाली. तूर्त कोणत्या आमदाराला मंत्रिपद द्यावे ते ठरलेले नाही, दरम्यान आणखी दोघांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याचे समजते.

गेली आठ वर्षे गोविंद गावडे हे मंत्रिपदी कायम राहिले, २०१७ साली प्रथम प्रियोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्यानंतर प्रथमच मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते २०२२ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले. गावडे यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चांगले संबंध होते. पण काही दिवसांपूर्वी उटाच्या कार्यक्रमात गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर सडकून टीका केली होती. हे खाते मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच आहे. या खात्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप गावडे यांनी जाहीरपणे केल्यानंतर मुख्यमंत्री दुखावले होते, गावडे यांना मंत्रिमंडळातून काढावे, असे त्यावेळीच ठरवून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रस्ताव पाठवला होता. पक्षश्रेष्ठींनी प्रस्तावाला काल मान्यता दिली व लगेच मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना डच्चू दिला.

...म्हणून वगळले

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळणार असल्याच्या चर्चा अधून-मधून सुरूच होत्या. प्रेरणादिन कार्यक्रमात गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय झाल्याचीही चर्चा होती. परंतु भाजपमधील अंतर्गत गोटातील माहितीनुसार खरे कारण नंतरच उघड झाले. गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्यास उटाने दिलेला आंदोलनाचा इशारा त्यांना महागात पडला. त्यानंतर झालेली काही जणांची भाषणे महागात पडली. पक्षाला वेठीस धरण्याचा हा प्रकार भाजपने खपवून न घेण्याचे ठरवत गावडे यांना हटविण्याचा निर्णय घेतला.

राज्यपालांची अनुमती

दरम्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती आणि राज्यपालांनी ती मंजूर केली.

गोविंद गावडे यांची संघर्षाची भूमिका

चिरडलेल्या आणि दाबलेल्या लोकांचा मी कैवार घेतला, याची पावती गोवा क्रांतिदिनी मला मिळाली, यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? असे द्वीट गोविंद गावडे यांनी सोशल मीडिया साइट 'एक्स'वर केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'ज्या गोष्टीमुळे सरकारने ही भूमिका घेतली, त्या संघर्षाला आवाज देण्यासाठी मला मोकळे करण्यात आल्यामुळे मी सरकारचे आभार मानत आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये निवड करायची झाल्यास मी सत्याचीच बाजू घेईन.

मंत्रिमंडळातील दुसरा बदल

सावंत यांनी २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या पूर्ण कार्यकाळात कॅबिनेट मंत्र्याला काढून टाकण्याची ही दूसरी वेळ आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदावरून नीलेश काब्राल यांना काढून टाकले होते.

सर्वांशी चर्चा करूनच निर्णय : नाईक

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळायचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करूनच घेण्यात आला असल्याचे भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की गावडे यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय केंद्रीय नेत्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतरच घेण्यात आला. असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

फेररचना होणार

दरम्यान, रमेश तवडकर की अन्य कुणाला मंत्रिमंडळात घेतले जाईल, ते स्पष्ट नाही. सध्या जागा रिकामीच ठेवली जाईल. मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना नंतर म्हणजे पुढील महिन्यात होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

आलेक्सना वगळणार का?

दरम्यान, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. दिल्लीतील इस्पितळात त्यांच्या लिव्हरवर शस्त्रक्रिया केली गेली. ती यशस्वी झाली. तरीही ते दिल्लीत आराम करण्यासाठी थांबले आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे की अन्य कुणाला वगळावे या प्रश्नाचे उत्तर सध्या भाजप शोधत आहे, अशी माहिती मिळाली. उत्तर गोव्यातील एका मंत्र्याला वगळून तिथे संकल्प आमोणकर यांची वर्णी लावावी व आलेक्सना वगळून पुन्हा नीलेश काब्राल यांना घ्यावे अशा प्रकारची चर्चा भाजपच्या आतील गोटात सुरू झाली आहे. ख्रिस्ती धर्मीय मंत्री वगळता तर दुसऱ्या ख्रिस्तीधर्मीय आमदारालाच तिथे मंत्री म्हणून घ्यावे असे पक्षातील काहीजण सूचवत आहेत. मंत्री होण्यासाठी आणखी काहीजणांनी फिल्डिंग लावली आहे.

केंद्रीय स्तरावरील मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला. गावडे यांच्या जागी कुणाला घ्यायचे किंवा आणखी कुणाला मत्रिमंडळातून वगळणार आणि कुणाला घेणार, हे तूर्त ठरलेले नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणBJPभाजपा